आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022 घ्या फॅन्सची धमाल:आरबीसीच्या धमाकेदार फटकेबाजीने डोळ्यांचे पारणे फिटले; कार्तिक आणि शहाबाज जोडीचे कौतुक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक आणि शाहबाज यांच्या अर्धशतकी भागीदारीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने बाजी मारत राजस्थान रॉयल्सचा 4 गड्यांनी पराभव केला. आरबीसीचा हा दुसरा विषय असून राजस्थानला पहिल्यांदाच पराभवास सामोरे जावे लागले आहे. कार्तिक आणि शहाबाज ही जोडी या विजयासाठी कारणीभूत असल्याचे मत या चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

राजस्थानला तीन बाद 169 धावांवर रोखण्यात आरसीबीला यश आले होते. मात्र, बिनबाद 55 धावांवरून संघाचा डाव 4 बाद 62 धावा असा घसरला होता. मात्र नंतर दिनेश कार्तिक आणि शहाबाज अहमद यांनी 67 धावांची भागीदारी करत राजस्थानच्या हातात गेलेला डाव पुन्हा खेचून आणला.

कार्तिकच्या खेळीचे कौतुक

आरबीसी संघाच्या विजयात दिनेश कार्तिकचा मोठा वाटा आहे. त्याच्या मुळेच संघ विजयी झाला असल्याचे मत चाहत्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले. कार्तिक आणि शहाबाज यांनी दबावाच्या क्षणी अर्धशतकी भागीदारी करत सामना खेचून आणला. आजच्या सामन्यामुळे आरबीसी आयपीएल विचयाचा पक्का दावेदार असल्याचे दिसून आले, असेही मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

वेगवान गोलंदाज हर्षल पाटेल याने 4 षटकांमध्ये केवळ 18 धावा देत देवदत्त पडीक्कलची विकेट घेतली. आरबीसीच्या गोलंदाजांनी जास्त धावा दिल्या नाहीत. त्यामुळे राजस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळाले.

बातम्या आणखी आहेत...