आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरुचा रोमहर्षक विजय:बंगळुरुने रोखला राजस्थानचा विजयरथ, कार्तिक आणि शाहबाजच्या जोडीने खेचून आणला विजय, हर्षदने मारला विजयी षटकार!

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 13 व्या सामन्यात ​​​​​​राजस्थान संघाने दिलेले ​170 धावांचे आव्हान पार करून​​​​ रॉयल चॅलेंजर्सने बंगळुरुने विजय मिळविला. बंगळुरुच्या या विजया्ने सलग दोन सामने जिंकणाऱ्या राजस्थान रॉयलचा विजयरथही रोखला.

9व्या षटकात सामन्यावर संपुर्ण पकड मिळवणाऱ्या राजस्थानचा विजय दृष्टीपथात दिसत होता पण कार्तिक आणि शाहबाजच्या जोडीने राजस्थानच्या तोंडचा घास हिरावत विजय खेचून आणला.

बंगळुरुने हा सामना 4 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 3 गडी बाद 169 धावा केल्या. जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर यांनी आक्रमक खेळी करून शेवटच्या 5 षटकांत 66 काढल्या आणि त्यांनी राजस्थानला सन्मानजनक स्थितीत आणून ठेवले. बंगळुरुकडून हसरंगा, विली आणि हर्षल यांनी 1-1 बळी घेतले.

धावांचा पाठलाग करताना बंगळुरुची सुरूवात दमदार झाली. पण त्यानंतर 9 व्या षटकांत बंगळुरुची पडझड झाली. त्यांचे फलंदाज ढेपाळले आणि पाच गडी गमावून 13 षटकांत बंगळुरु संघाच्या 88 धावाच झाल्या होत्या. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज याने दमदार खेळी करून बंगळुरुला विजय प्राप्त करून दिला. हर्षद पटेलने षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामन्याचा लाईव्ह स्कोअर बघण्यासाठी येथे क्लिक करा

शाहबाजचे हुकले अर्धशतक

शाहबाज ​​​​​अहमदने शैलीदार फलंदाजी करताना अवघ्या 26 चेंडूत 45 धावा केल्या. बंगळुरूच्या विजयात शाहबाजचा मोठा वाटा होता. तो अर्धशतक करू शकला असता, पण ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अहमदला आरसीबीने मेगा लिलावात 2.40 कोटींना विकत घेतले.

कार्तिक, शाहबाजने खेचला विजय

62 धावांत बंगळुरुचे चार गडी बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी संघाला तारले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 32 चेंडूत 67 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या समीप नेले. मात्र, 18व्या षटकातील पाचव्या चेंडूवर 165 धावांवर शाहबाज ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. त्याने 26 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 45 धावांचे योगदान दिले.

दिनेश कार्तिकची स्फोटक फलंदाजी

14व्या षटकात दिनेश कार्तिक फायर मूडमध्ये दिसला. अश्विनच्या चेंडूवर त्याने चार चौकार लगावले. कार्तिकने तिसरा चौकार मारला, तेव्हा पंचांनी नो-बॉल दिला. कार्तिकने फ्री हिटमध्ये षटकारही लगावला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारताना चौकारांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. कार्तिकचा झंझावत सुरूच राहीला. षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने चौकारही मारला. या षटकात 21 धावा त्याने केल्या. पुढच्याच षटकात त्याने नवदीप सैनीलाही सलग दोन चौकार ठोकले.

9व्या षटकात सामन्याचा नूर पालटला

आरसीबीच्या डावाच्या 9व्या षटकात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाने सलग 2 चेंडूत 2 गडी बाद केले. 9व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहली 5 धावांवर धावबाद झाला आणि पुढच्याच चेंडूवर युझवेंद्र चहलने डेव्हिड विलीला आपल्या जादूई चेंडूवर क्लीन बोल्ड केले. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विलीच्या बॅट आणि पॅडच्या गॅपमधून चेंडू मधल्या स्टंपवर आदळला.

बंगळुरूची दमदार सुरुवात

लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात चांगली झाली. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत यांनी पहिल्या विकेटसाठी 7 षटकांत 55 धावा जोडल्या. युझवेंद्र चहलने फाफला बाद करून ही भागीदारी मोडली. डू प्लेसिस 20 चेंडूत 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा झेल ट्रेंट बोल्टने लाँग ऑनवर टिपला. पुढच्याच षटकात रावत (26) याला नवदीप सैनीने बाद केले.

बटलर, हेटमायर चमकले

RCB चा कर्णधार फाफ डु प्लेसिस ने नाणेफेक जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला.शेवटच्या पाच षटकांत त्यांनी बंगळुरुच्या गोलंदाजाची चांगली धुलाई केली. बटलरने 47 चेंडूत 70 धावा केल्या तर हेटमायरने 31 चेंडूत 42 धावा केल्या. 20 षटकानंतर राजस्थान रॉयलची धावसंख्या 3 गडी बाद 169 धावा अशी होती.

बटलरचा झंझावत, षटकारांचेही शतक

3 जीवदान मिळाल्यानंतर बटलरने 41 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील 12 वे अर्धशतक पूर्ण केले. बटलरने या डावात 6 उत्तुंग षटकार ठोकले. झंझावाती खेळीतील दुसऱ्या षटकारासह जोसने आयपीएलमधील 100 षटकार पूर्ण केले. बटलर आयपीएलच्या इतिहासात षटकार मारणारा इंग्लंडचा पहिला आणि एकूण 26 वा खेळाडू ठरला.

बटलरला मिळाले तीन जीवदान

सातव्या षटकात जोस बटलरला दोन जीवदान मिळाले. षटकाच्या पहिल्या चेंडूवर आकाश दीपने त्याच्याच षटकात झेल सोडला आणि चौथ्या चेंडूवर डेव्हिड विलीने मिडविकेटवर झेल सोडला. यानंतर बटलरने 5 व्या चेंडूवर लाँग ऑफवर सुरेख षटकार ठोकला. 14 व्या षटकात जोस हर्षल पटेलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला, पण त्याने रिव्ह्यू घेतला आणि त्याला सामन्यातील तिसरे जीवदान मिळाले.

हसरंगाच्या वळणावर सॅमसन अडकला

संजू सॅमसनने 8 चेंडूत 8 धावा केल्या आणि त्याला वानिंदू हसरंगाने बाद केले. हसरंगाने टी-20 फॉरमॅटच्या पाच डावांत चौथ्यांदा सॅमसनला बाद केले. वनिंदूने सामन्यात 4 षटके टाकली आणि 32 धावांत 1 बळी घेतला.

बटलर-पडिक्कल भागीदारी

6 धावांच्या स्कोअरवर राजस्थानने पहिला गडी गमावला. त्यानंतर जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सांभाळताना चांगली भागीदारी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 70 धावा जोडल्या. ही जोडी हर्षल पटेलने पडिक्कलला (37) बाद करून फोडली. त्याचा झेल कोहलीने एक्स्ट्रा कव्हरवर टिपला.

पॉवर प्लेमध्ये संथ सुरुवात

पहिल्या 6 षटकांत राजस्थानची सुरुवात खास झाली नाही. पॉवर प्लेमध्ये संघाने केवळ 35 धावा केल्या आणि 1 गडी गमावला. यादरम्यान संघाकडून केवळ एक चौकार आणि एक षटकार लगावला गेला.

यशस्वी पुन्हा फ्लॉप

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना राजस्थान रॉयलची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात डेव्हिड विलीने यशस्वी जैस्वालला क्लिन बोल्ड केले. तो 6 चेंडूत 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये जैस्वालची बॅट शांतच होती. तो सन रायझर हैद्राबादविरुद्ध 20 आणि मुंबई इंडीयन्सविरुद्ध 1 धावांवर बाद झाला होता.

आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडेच आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. गुणतालिकेत प्रथम स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून हे दोन्हीही सामने त्यांनी जिंकले आहेत. दोन सलग विजयामुळे राजस्थान संघाचे मनोबल वाढलेले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला दोन पैकी एका सामन्यात विजय मिळालेला असून दुसऱ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. एका पराभवामुळे बंगळुरु संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

बातम्या आणखी आहेत...