आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • RCB Vs DC 22nd IPL Match LIVE Score; Rishabh Pant Virat Kohli AB De Villiers Glenn Maxwell Dhawan Prithvi Shaw | Ahmedabad Narendra Modi Stadium News | Royal Challengers Bangalore Vs Delhi Capitals IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RCB Vs DC:अटीतटीच्या लढतीत बंगळुरुचा दिल्लीवर 1 धावेने विजय, गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

अहमदाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखेरच्या ओव्हरमध्ये 14 धावा काढू शकला नाही दिल्लीचा संघ
  • डिविलियर्सच्या नावे लीगमध्ये सर्वात कमी बॉलमध्ये 5000 रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड

IPL च्या 14 व्या सत्रातील 22वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सवर 1 रनाने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने दिल्लीला 175 धावांचे लक्ष्य दिले होते. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 170 धावा काढू शकला.
सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दिल्लीकडून शिमरुन हेटमायर आणि ऋषभ पंतने अर्धशतके लगावली. हेटमायरने 53 आणि पंतने 58 धावा केल्या. या दोघांशिवाय, मार्कस स्टोइनसने 22 आणि पृथ्वी शॉने 21 रन काढले. बंगळुरुकडून हर्षल पटेलने 2 तर, मोहम्मद सिराज आणि काइल जेमिसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
IPL मध्ये पृथ्वी शॉच्या 1000 धावा पूर्ण

पृथ्वी शॉ 18 बॉलमध्ये 21 रन काढून आउट झाला. दरम्यान, शॉने IPL मध्ये 1000 रन पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा तो आयपीएलमधील 77वा खेळाडून बनला आहे. शॉने आतापर्यंत 44 सामन्यात 1013 रन काढले.

बंगळुरुची खराब सुरुवात
बंगळुरुची सुरुवात खराब झाली होती. संघाच्या सलग दोन बॉलमध्ये दोन विकेट पडल्या. कर्णधार विराट कोहली 11 बॉलमध्ये 12 रन काढून आवेश खानच्या बॉलवर आउट झाला. यानंतर, इशांत शर्माने देवदत्त पडिक्कलला 17 धावांवर क्लिन बोल्ड केले. यानंतर अमित मिश्राने ग्लेन मॅक्सवेलला 25 रनांवर आउट केले. अमित मिश्राने मागील 6 सामन्यात मॅक्सवेलला 5व्यांदा आउट केले आहे. तर, रजत पाटीदार 22 बॉलमध्ये 31 रन काढून अक्षर पटेलच्या बॉलवर झेलबाद झाला.

डिविलियर्सच्या 5 हजार धावा पूर्ण
डिविलियर्सने IPL मधले 40वे अर्धशतक पूर्ण केले आहे. अर्धशतकांच्या बाबतीत डिविलियर्सने रोहित आणि विराटची बरोबरी केली आहे. याशिवाय, डिविलियर्सचे IPL मध्ये 5 हजार रनदेखील पूर्ण झाले आहेत. ही कामगिरी करणारा विराट सहावा खेळाडून आहे. त्याच्यापूर्वी विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन, डेविड वॉर्नरने ही कामगिरी केली आहे. पण, डिविलियर्सने सर्वात कमी बॉल (3288 बॉल) मध्ये 5 हजार रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

दोन्ही संघ

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, इशांत शर्मा, अक्षर पटेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा आणि आवेश खान.

बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्‍कल, रजत पाटीदार, एबी डिविलियर्स, ग्लेन मैक्सवेल, वॉशिंगटन सुंदर, डेनियल सैम्स, काइल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

बातम्या आणखी आहेत...