आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 70 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (RCB) 6 गड्यांनी विजय मिळवला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात बंगळुरूने विजयासाठी दिलेले 198 धावांचे आव्हान गुजरातने 19.1 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
शुभमन गिलचे मॅच विनिंग नाबाद शतक
गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद 104 धावांची मॅच विनिंग खेळी केली. त्यानंतर विजय शंकरने 53, तर वृद्धिमान साहाने 12 धावा केल्या. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने 2, तर विजय कुमार वैशाख आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा करत गुजरातला विजयासाठी 198 धावांचे आव्हान दिले.
गुजरातचा डाव
याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. त्यांचा ओपनर वृद्धिमान साहा तिसऱ्या षटकांत 12 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याची विकेट घेतली. त्यानंतर शुभमन गिल आणि विजय शंकरने डाव पुढे नेत दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. पंधराव्या षटकात विजय शंकरला 53 धावांवर बाद करत विजयकुमार वैशाखने ही जोडी फोडली. तर पुढच्याच षटकात हर्षल पटेलने दसुन शनाकाला शून्यावर बाद केले. त्यानंतर अठराव्या षटकात मोहम्मद सिराजने डेव्हिड मिलरला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर गिल आणि तेवतियाने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.
अशा पडल्या गुजरातच्या विकेट
विराटचे नाबाद शतक
बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 101 धावा केल्या. त्यानंतर फाफ डु प्लेसिसने 28, मायकल ब्रेसवेलने 26, अनुज रावतने 23 धावा केल्या. गुजरातकडून नूर अहमदने 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बंगळुरूचा डाव
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूला ओपनर फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी चांगली फटकेबाजी करत पहिल्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात फाफ डु प्लेसिसला 28 धावांवर बाद करत नूर अहमदने ही जोडी फोडली. त्यानंतर नवव्या षटकात राशिद खानने ग्लेन मॅक्सवेलला 11 धावांवर बाद केले. तर दहाव्या षटकात नूर अहमदच्या चेंडूवर वृद्धिमान साहाने महिपाल लोमरोरला 1 धावेवर स्टंप केले. तर चौदाव्या षटकात मोहम्मद शमीने मायकल ब्रेसवेलला 26 धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात यश दयालने दिनेश कार्तिकला शून्यावर बाद केले.
अशा पडल्या बंगळुरूच्या विकेट
बंगळुरूने 13 पैकी सात सामने जिंकले
या मोसमात बंगळुरूने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी सात जिंकले आणि सहा सामने गमावले. संघाचे 14 गुण आहेत. हा संघ आज विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतो, त्याचप्रमाणे त्यांना मुंबईपेक्षा धावगतीही अधिक राखावी लागणार आहे. सामना गमावल्यानंतर, मुंबईनेही आपला सामना गमावावा अशी संघाची इच्छा राहील.
फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल आणि वेन पारनेल हे गुजरातविरुद्धच्या संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
गुजरातने १३ पैकी नऊ सामने जिंकले
गुजरातने या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने नऊ जिंकले आणि फक्त चार सामने गमावले. दहा संघांच्या गुणतालिकेत हा संघ १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. आजचा सामना हरल्यानंतरही हा संघ नंबर-1 वरच राहणार आहे. अशा स्थितीत संघ आज प्रयोग करू शकतो.
डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राशिद खान आणि नूर अहमद हे बंगळुरूविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि वृद्धिमान साहा हे खेळाडूही संघाला मजबूत करत आहेत.
दोन्ही संघ हेड टू हेड बरोबरीत
लीगमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचे हे दुसरे सत्र आहे. हेड टू हेडबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. दोघांनीही प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.