आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • RCB Vs KKR 10th IPL Match LIVE Score; Virat Kohli Eoin Morgan Glenn Maxwell | Chennai MA Chidambaram Stadium News | Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

विराट विजयाची हॅट‌्ट्रिक:बंगळुरू टीमची काेलकाता नाइट रायडर्सवर 38 धावांनी मात

चेन्नई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेहलीच्या नेतृत्वात बंगळुरूचा सत्रात सलग तिसरा विजय साजरा

विराट काेहलीच्या कुशल नेतृत्वात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने रविवारी यंदाच्या १४ व्या सत्रातील आयपीएलमध्ये विजयाची हॅट््ट्रिक साजरी केली. बंगळुरू संघाने लीगमधील आपल्या तिसऱ्या सामन्यात माॅर्गनच्या काेलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. बंगळुरू टीमने ३८ धावांनी सामना जिंकला. यासह सत्रात सलग तिसरा सामना जिंकून आपली माेहिम कायम ठेवणारा बंगळुरू हा पहिला संघ ठरला. काेलकाता संघाला लीगमध्ये दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. आता बंगळुरू टीम ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात काेलकाता संघाला आठ गड्यांच्या माेबदल्यात १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात, कोलकाताची सुरुवात चांगली झाली. मात्र, एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. अव्वल ७ पैकी ६ फलंदाज दहाचा आकडाही गाठू शकले नाहीत. केवळ आंद्रे रसेलने सर्वाधिक ३० धावा काढल्या. डावाच्या १९ व्या षटकात पहिल्या पाच चेंडूंवर मो. सिराजविरुद्ध रसेल एकही चौकार मारू शकला नाही आणि पळून धावही. संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १६६ धावा करू शकला. काइल जेमिसनने ३ आणि युजवेंद्र चहल व हर्षल पटेलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. सत्रात प्रथमच एखाद्या संघाने चेन्नईच्या मैदानावर २००+ धावा केल्या. कोहली व पाटीदार बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने (७८) पड्डीकलसोबत तिसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. तो सत्रात सर्वाधिक १७६ धावा करणारा फलंदाज बनला. अखेरच्या षटकात ३४ चेंडूंत ७६ धावांची खेळी करत डिव्हिलियर्सने संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीने २ गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...