आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 च्या 9 व्या सामन्यात कोलकता नाईट रायडर्स (KKR)ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (RCB) मोठा विजय मिळवला. शार्दुलचे वेगवान अर्धशतक आणि वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा आणि सुनील नारायणच्या गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने बंगळुरूला मात दिली.
बंगळुरूचा डाव
कोलकात्याने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत 123 धावांवर बाद झाला. बंगळुरूकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 23, विराट कोहलीने 21, डेव्हिड विलीने 20, मायकल ब्रेसवेलने 19 तर आकाश दीपने 17 धावा केल्या.
कोलकात्याकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्यानंतर सुयश शर्माने 3, सुनील नारायणने 2 तर शार्दुल ठाकूरने 1 विकेट घेतली.
कोलकात्याचा डाव
तत्पूर्वी कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. कोलकात्याकडून शार्दुलने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाजने 57, रिंकू सिंगने 46 धावा केल्या.
बंगळुरूकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 तर सिराज, ब्रेसवेल व पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
सामन्याचे टर्निंग पॉइंटस
1. शार्दुलची धडाकेबाज खेळी
पहिल्या डावात कोलकात्याचे 5 गडी 89 धावांत बाद झाल्यावर शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला. त्याने 29 चेंडूंत 68 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याने रिंकूसह 103 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 200 च्या पार नेली.
2. स्पिनर्स ठरले गेमचेंजर
205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने 4 षटकांत 42 धावा केल्या. मात्र तिथून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायणने 17 धावांतच 5 बळी घेतले. शेवटी सुयश शर्माने 3 विकेट घेत बंगळुरूला बॅकफूटवर ढकलले.
3. बंगळुरूच्या फलंदाजांचे अपयश
बंगळुरूकडून कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. 44 धावांच्या ओपनिंग पार्टनरशिपशिवाय सामन्यात दुसरी मोठी भागीदारी झाली नाही. टीमच्या विकेट सलग पडत गेल्या आणि दुसऱ्या डावात ते बॅकफूटवर गेले.
सुनील-वरुणच्या 5 विकेट
205 धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरूला विराट अन फाफने जोरदार सुरूवात मिळवून दिली. दोघांनी 4 षटकांत 42 धावा केल्या. तेव्हा पाचव्या षटकात सुनील नारायणने कोहलीला बोल्ड केले. सहाव्या षटकात वरुण चक्रवर्तीने बोल्ड केले. सातव्या षटकात विकेट पडली नाही. 8 व्या षटकात वरुणने ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेलला बोल्ड केले. 9 व्या षटकात सुनीलने शाहबाज अहमदला झेलबाद केले. अशा रितीने 17 धावांतच बंगळुरूच्या 5 विकेट गेल्या.
अशा पडल्या बंगळुरूच्या विकेट
कोलकाताचा डाव
तत्पूर्वी फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताच्या संघाने 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. बंगळुरूसमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान आहे. कोलकात्याकडून शार्दुलने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाजने 57, रिंकू सिंगने 46 धावा केल्या. बंगळुरूकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 तर सिराज, ब्रेसवेल व पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
रिंकू-शार्दुलची शतकी भागीदारी
89 धावसंख्या असताना कोलकाताने 5 विकेट गमावल्या होत्या. तेव्हा फलंदाजीला आलेल्या शार्दुल ठाकूरने मोठे शॉट खेळले. त्याने 20 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने रिंकू सिंगसोबत 47 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली. रिंकू 46 तर शार्दुल 68 धावा करून बाद झाला.
बंगळुरूचा गोलंदाज डेव्हिड विलीने चौथ्या षटकात दोन धक्के दिले. त्याने कोलकात्याच्या व्यंकटेश अय्यर आणि मनदीप सिंगला बाद केले. यानंतर रहमानउल्ला गुरबाजने कोलकात्याचा डाव सावरत अर्धशतक केले. मात्र कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर तो आकाश दीपच्या हाती झेलबाद झाला. त्याच्यानंतर आलेला रसेलही शून्यावरच कोहलीच्या हाती झेलबाद झाला. कोलकात्याला एकामागोमाग एक दोन मोठे धक्के बसले. यानंतर शार्दुल ठाकूरने वेगवान अर्धशतक करत कोलकात्याचा डाव सावरला. त्याला रिंकू सिंगची संयमी साथ मिळाली.
आयपीएल 2023 मधील वेगवान अर्धशतक
शार्दुल ठाकूरने 20 चेंडूंतरच अर्धशतक ठोकले. या आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. मायकल ब्रेसवेलच्या षटकात त्याने सलग 2 षटकार ठोकले. त्याने 17 व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. राजस्थान रॉयल्सच्या बटलरची बरोबरी त्याने केली आहे. बटलरनेही हैदराबादविरोधातील सामन्यात 20 चेंडूंतच अर्धशतक केले होते.
कर्ण शर्माने घेतल्या 2 विकेट
बंगळुरूच्या कर्ण शर्माने 12 व्या षटकात रहमानउल्ला गुरबाजला झेलबाद केले. तो 57 धावा करून बाद झाला. नंतर पुढच्याच चेंडूवर त्याने रसेललाही झेलबाद केले.
गुरबाजची 38 चेंडूंत फिफ्टी
रहमानउल्ला गुरबाजने 38 चेंडूंत आपली पहिली फिफ्टी केली. त्याने पॉवर प्लेमध्ये मोठे शॉटस खेळत कोलकात्याचा डाव सावरला. सोबत स्वतःचे अर्धशतकही पूर्ण केले.
पॉवर प्लेमध्ये गमावल्या 2 विकेट
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकात्याला रहमानउल्ला गुरबाजने वेगवान सुरुवात मिळवून दिली. मात्र चौथ्या षटकात डेव्हिड विलीने व्यंकटेश अय्यर आणि मनदीप सिंगला बोल्ड केले. गुरबाजने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकांत मोठे शॉट मारले आणि 6 षटकांत संघाची धावसंख्या 47 वर नेली.
मनदीपच्या नावे नको असेलला विक्रम
KKR चा मनदीप सिंग IPL मध्ये 15व्यांदा शून्यावर बोल्ड झाला. टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा 14-14 वेळा शून्यावर आऊट होत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अशा पडल्या कोलकात्याच्या विकेट
केकेआरचे हे घरचे मैदान आहे. कोलकाता संघ 2019 नंतर प्रथमच येथे खेळणार आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी बाद फेरीचे सामने खेळण्यात आले होते. मात्र त्याआधी केकेआर लीगमधून बाहेर पडला होता. दुसरीकडे, गेल्या वर्षी आयपीएलच्या टप्प्यात केकेआर आणि आरसीबी आमनेसामने होते. ज्यामध्ये RCB चा विजय झाला होता.
दोन्ही संघातील प्लेइंग-11
कोलकाता नाईट रायडर्स :
नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, मनदीप सिंग,आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्टपूल प्लेयर - सुयश शर्मा,अनुकुल रॉय, जगदीशन, डेव्हिड विसे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा आणि आकाश दीप.
इम्पॅक्टपूल प्लेयर : अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, .
घरच्या मैदानावर कोलकात्याला हरवले पंजाबने
कोलकाता नाईट रायडर्सची या आयपीएलमध्ये म्हणावी तशी चांगली सुरूवात झाली नाही. यापूर्वी डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाताचा 7 धावांनी पराभव केला होता. तो पराभव विसरून विजयाचे खाते उघडण्यासाठी संघ सज्ज झालेला आहे.
बंगळुरूविरूद्धच्या संघाचे चार परदेशी खेळाडू आंद्रे रसेल, रहमानउल्ला गुरबाज, सुनील नरेन आणि टीम साऊदी असू शकतात. त्यांच्याशिवाय नितीश राणा, शार्दुल ठाकूर आणि व्यंकटेश अय्यर हेही संघाला मजबूत करतील.
बंगळुरूने केली होती विजयाने सुरूवात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची आयपीएल स्पर्धेची सुरूवात विजयाने केली. संघाने घरच्या मैदानावर मुंबईचा 8 गडी राखून मोठ्या फरकाने पराभव केला. कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीने अर्धशतक केले होते. तर कर्ण शर्माने पहिल्या डावात 32 धावांत 2 विकेट घेतल्या.
कोलकाता विरुद्ध संघाचे 4 परदेशी खेळाडू फाफ डु प्लेसिस, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल आणि रीस टोपले असू शकतात. याशिवाय विराट कोहली, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज हेही संघाला मजबूत बनवत आहेत.
बंगळुरूवर कोलकाता टीम राहीली नेहमी वरचढ
आयपीएलच्या या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स प्रथमच आमनेसामने येणार आहेत. पण, दोन्ही संघांमधील आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या आधारे, जर आपण हेड टू हेडबद्दल बोललो, तर दोघेही एकूण 30 सामन्यांमध्ये भिडले आहेत. यापैकी कोलकाताने जास्त वेळा बाजी मारली आहे. संघाने सर्वाधिक 16 सामने जिंकले आहेत, तर बेंगळुरूने एकूण 14 सामने जिंकले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.