आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) 18 धावांनी हरवले. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा करत लखनऊला विजयासाठी 127 धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना लखनऊला 19.5 षटकांत 10 गडी गमावून 108 धावांपर्यंतच मजल मारता आली.
अमित मिश्राची झुंजार खेळी
लखनऊकडून कृष्णप्पा गौतमने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्यानंतर अमित मिश्राने 19 धावांची झुंजार खेळी केली. तर कृणाल पंड्याने 14, मार्कस स्टॉयनिस व नवीन-उल-हकने प्रत्येकी 13 धावा केल्या. बंगळुरूकडून जोश हेझलवूड आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
लखनऊचा डाव
बंगळुरूने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर काईल मेयर्स पहिल्याच षटकात शून्यावर आऊट झाला. मोहम्मद सिराजने त्याची विकेट घेतली. त्यानंतर चौथ्या षटकात कृणाल पंड्या 14 धावांवर आऊट झाला. मॅक्सवेलने त्याची विकेट घेतली. तर त्यानंतर पाचव्या षटकात जोश हेझलवूडने आयुष बडोनीला 4 धावांवरच आऊट केले. तर पुढच्याच षटकात वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने दीपक हुडाला 1 धावेवर स्टंप केले. त्यानंतर सातव्या षटकात कर्ण शर्माने निकोलस पूरनला 9 धावांवर आऊट केले. कर्ण शर्माने नंतर अकराव्या षटकात मार्कस स्टॉयनिसला 13 धावांवर बाद केले. तर बाराव्या षटकात कृष्णप्पा गौतम 23 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर पंधराव्या षटकात रवि बिश्नोईही 5 धावांवर धावबाद झाला. नंतर एकोणिसाव्या षटकात हेझलवूडने नवीन उल हकला 13 धावांवर बाद केले. तर 19 धावांची झुंजार खेळी करणाऱ्या अमित मिश्राला विसाव्या षटकात हर्षल पटेलने आऊट केले. लखनऊला 19.5 षटकांत 108 धावांपर्यंतच मजल मारता आली.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या लखनऊच्या विकेट
फाफचे अर्धशतक हुकले
बंगळुरूकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 44 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीने 31, दिनेश कार्तिकने 16 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. लखनऊकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्यानंतर रवि बिश्नोई आणि अमित मिश्राने प्रत्येकी 2 तर कृष्णप्पा गौतमने 1 विकेट घेतली.
बंगळुरूचा डाव
बंगळुरूला ओपनर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात विराट कोहलीला 31 धावांवर बाद करत रवि बिश्नोईने ही जोडी फोडली. कोहली आऊट झाल्यानंतर आलेला अनुज रावत बाराव्या षटकात 9 धावांवर बाद झाला. कृष्णप्पा गौतमने त्याची विकेट घेतली. त्यानंतर तेराव्या षटकात रवि बिश्नोईने ग्लेन मॅक्सवेलला 4 धावांवर बाद केले. त्यानंतर पंधराव्या षटकात अमित मिश्राने सुयश प्रभूदेसाईला 6 धावांवर बाद केले. मिश्राने त्यानंतर सतराव्या षटकात फाफ डु प्लेसिसलाही 44 धावांवर बाद केले. तर त्यानंतर पुढच्याच षटकात नवीन-उल-हकने महिपाल लोमरोरला 3 धावांवर बाद केले. तर पुढच्याच षटकात दिनेश कार्तिक 16 धावांवर धावबाद झाला. तर नंतर शेवटच्या षटकात नवीन उल हकने कर्ण शर्माला 2, तर मोहम्मद सिराजला शून्यावर बाद केले. बंगळुरूला 20 षटकांत 126 धावा करता आल्या.
अशा पडल्या बंगळुरूच्या विकेट
कोहली-फाफची अर्धशतकी भागीदारी
बंगळुरूला ओपनर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात विराट कोहलीला 31 धावांवर बाद करत रवि बिश्नोईने ही जोडी फोडली
दोन्ही संघांचे प्लेइंग-11...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवूड.
इम्पॅक्ट प्लेयर : हर्षल पटेल, शहबाज, वैशाख, ब्रेसवेल आणि सोनू यादव.
लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, नवीन उल हक, यश ठाकूर, रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा.
इम्पॅक्ट प्लेयर्स : आयुष बडोनी, डॅनियल सॅम्स, आवेश खान, डिकॉक आणि प्रेरक मंकड.
लखनऊने 8 पैकी फक्त 5 सामने जिंकले
या मोसमात लखनऊने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने पाच जिंकले आणि तीन सामने गमावले. एलएसजीचे सध्या 10 गुण आहेत. लखनऊने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाबचा पराभव केला होता.
बंगळुरूविरुद्ध संघाचे चार विदेशी खेळाडू काईल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक असू शकतात. याशिवाय केएल राहुल, रवी बिश्नोई आणि आवेश खान हे खेळाडू संघाला मजबूत बनवत आहेत.
बंगळुरूने 8 पैकी 4 सामने जिंकले
बेंगळुरूने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 4 विजय आणि 4 पराभव पत्करले आहेत. संघाचे 8 गुण आहेत. बंगळुरूला मागील सामन्यात कोलकात्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि डेव्हिड विली हे कोलकाताविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.
लखनऊवर बंगळुरूचे पारडे जड
लखनऊचा हा दुसरा सीझन आहे. हेड टू हेड बोलायचे झाले तर लखनऊवर बंगळुरूचे पारडे जड आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये बेंगळुरूने दोनदा आणि लखनऊने एकदा विजय मिळवला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.