आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमांचक सामन्यात लखनऊने बंगळुरूला हरवले:शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना, पूरन-स्टॉयनिसची अर्धशतके, सिराज-वेनच्या 3-3 विकेट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएल-16 मधील लखनऊ सुपरजायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) यांच्यातील रोमांचक सामन्यात लखनऊने बंगळुरूला 1 गड्याने हरवले. बंगळुरूने विजयासाठी दिलेले 213 धावांचे आव्हान लखनऊने 20 षटकांत 9 गडी गमावून पूर्ण केले.

लखनऊचा डाव

हे आव्हान पार करताना फलंदाजीला आलेल्या लखनऊची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर काइल मेयर्स पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. तर नंतर चौथ्या षटकात दीपक हुडा आणि कृणाल पंड्या बाद झाले. चारच षटकांत 23 धावांवर त्यांचे तीन फलंदाज बाद झाले. यानंतर स्टॉयनिस आणि केएल राहुलने संघाचा डाव सावरला. स्टॉयनिसने 30 चेंडूंत 65 धावांची स्फोटक खेळी केली. कर्ण शर्माच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. यानंतर पुढच्याच षटकात केएल राहुलही 18 धावांवर विराट कोहलीच्या हाती झेलबाद झाला. सिराजने त्याची विकेट घेतली. नंतर निकोलस पूरनने तडाखेबंद खेळी करत आयुष बडोनीसह 84 धावांची भागीदारी करत लखनऊच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पूरन 19 चेंडूंत 62 धावा करून बाद झाला. त्यानंतर आयुष बडोनीने चांगली खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. पण विजयासाठी 7 धावांची गरज असताना तो पार्नेलच्या चेंडूवर हिट विकेट झाला. यानंतर सामना अधिक रंजक झाला. नंतर 20 व्या षटकात लखनऊचे मार्क वूड आणि उनाडकटही बाद झाले आणि एका चेंडूत एका धावेची गरज अशी स्थिती निर्माण झाली. अखेर आवेश खान आणि रवी बिश्नोईने ही धाव पूर्ण करत संघाचा विजय मिळवून दिला.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड

सामन्याचे टर्निंग पॉइंट

  • आरसीबीची फलंदाजीः नाणेफेक हारल्यानंतर आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला, आरसीबीच्या केवळ 3 फलंदाजांनी 20 षटकांत संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. विराट कोहलीने 61, फाफ डू प्लेसिसने 79 आणि ग्लेन मॅक्सवेलने 59 धावा केल्या.
  • एलएसजीचा पॉवर प्लेः 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्येच संघाने 3 गडी गमावले.
  • स्टॉयनिसची खेळीः पॉवर प्लेमध्ये 3 गडी गमावल्यानंतर, एलएसजीकडून मार्कस स्टॉयनिसने 30 चेंडूत 65 धावा करत संघाला सामन्यात परत आणले.
  • राहुल-स्टॉयनिसच्या विकेटः स्टॉयनिस आणि राहुल यांनी एलएसजीला सामन्यात परत आणले. मात्र 12व्या षटकापर्यंत दोन्ही फलंदाज बाद झाले. स्टॉयनिसला कर्ण शर्मा आणि केएल राहुलला मोहम्मद सिराजने बाद केले.
  • पूरनची खेळीः 12व्या षटकात फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने 15 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने 19 चेंडूत 62 धावांची खेळी करत एलएसजीला पुन्हा सामन्यात आणले.
  • बडोनीची हिट-विकेटः एलएसजीला 8 चेंडूत 7 धावांची गरज होती. त्यानंतर आयुष बडोनीने स्कूप शॉट खेळला. चेंडू सीमापार गेला, पण बडोनीची बॅट स्टंपला लागली. अशा प्रकारे तो हिट विकेट झाला आणि संघाला 7 चेंडूत 7 धावांची गरज होती.

​​​​​​अशा पडल्या लखनऊच्या विकेट

  • पहिलीः पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने काइल मेयर्सला बोल्ड केले.
  • दुसरीः चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वेन पार्नेलने दीपक हुडाला दिनेश कार्तिकच्या हाती झेलबाद केले.
  • तिसरीः चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वेन पार्नेलने कृणाल पंड्याला दिनेश कार्तिकच्या हाती झेलबाद केले.
  • चौथीः अकराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्ण शर्माने मार्कस स्टॉयनिसला शाहबाजच्या हाती झेलबाद केले.
  • पाचवीः बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने केएल राहुलला विराट कोहलीच्या हाती झेलबाद केले.
  • सहावीः सतराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिराजने पूरनला शाहबाजच्या हाती झेलबाद केले.
  • सातवीः एकोणिसाव्या षटकात पूरनच्या गोलंदाजीवर चौथ्या चेंडूवर आयुष बडोनीची हिट विकेट गेली.
  • आठवीः विसाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने मार्क वूडला बोल्ड केले.
  • नववीः विसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हर्षल पटेलने उनाडकटला डु प्लेसिसच्या हाती झेलबाद केले.

पूरन-बडोनीची अर्धशतकी भागीदारी

निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी 35 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. दोघांनी 20 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पूरनने 15 चेंडूत कारकिर्दीतील 5 वे अर्धशतक पूर्ण केले.

स्टॉइनिसचे 5 वे अर्धशतक

स्टॉइनिसने कारकिर्दीतील 5 वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 30 चेंडूत 65 धावांची खेळी केली. स्टॉइनिसने 216.67 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने केएल राहुलसोबत 40 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली.

निकोलस पूरनचे 15 चेंडूंत अर्धशतक

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने तडाखेबंद फटकेबाजी करत 6 षटकार आणि 4 चौकारांची बरसात करत 15 चेंडूंतच फिफ्टी ठोकली. त्याने सहाव्या गड्यासाठी आयुष बडोनीसह धावांची भागीदारी करत लखनऊच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.

पॉवर प्लेमध्ये लखनऊला सुरुवातीला झटके

213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या लखनऊच्या टीमला सुरूवातीच्या षटकांतच झटके बसले. पहिल्या षटकात मोहम्मद सिराजने काइल मेयर्सला बोल्ड केले. नंतर वेन पार्नेलने हुडा आणि कृणाल पंड्याला आऊट केले. पॉवर प्लेमध्ये टीमला 3 गडी गमावून 37 धावाच करता आल्या.

बंगळुरूचा डाव

लखनऊने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 2 गडी गमावून 212 धावा केल्या. बंगळुरूकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 79, विराटने 61 तर मॅक्सवेलने 59 धावा केल्या. लखनऊकडून अमित मिश्राने विराटची तर मार्क वूडने शेवटच्या षटकात मॅक्सवेलची विकेट घेतली.

बंगळुरूचे ओपनर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने बंगळुरूला वेगवान सुरूवात करून दिली. कोहलीने जोरदार फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये संघाला 56 धावांपर्यंत पोहोचवले. कोहलीने शानदार 61 धावा केल्या. तो बाराव्या षटकात अमित मिश्राच्या चेंडूवर बाद झाला. कोहलीने डु प्लेसिससोबत पहिल्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी केली. यानंतर आलेला मॅक्सवेले डु-प्लेसिसला चांगली साथ देत संघाची धावसंख्या पुढे नेली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. दोघांनीही अर्धशतक पूर्ण करत संघाला 211 धावसंख्येवर पोहोचवले. मॅक्सवेल शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बोल्ड झाला. मार्क वूडने त्याची विकेट घेतली. शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी आलेल्या दिनेश कार्तिकने 1 धाव केली.

मॅक्सवेल-डु प्लेसिसची शतकी भागीदारी

विराट कोहली आऊट झाल्यावर ग्लेन मैक्सवेलने आक्रमक फलंदाजी करत फाफला चांगली साथ दिली. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या 200 पार नेली. मॅक्सवेल 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाद झाला. दोघांनी 50 चेंडूंत 115 धावांची भागीदारी केली.

मॅक्सवेलची 24 चेंडूंत फिफ्टी

विराटनंतर ग्लेन मॅक्सवेलने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 24 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. 29 चेंडूंत तडाखेबाज 59 धावा करून तो बाद झाला.

कोहली-डु प्लेसिसची 96 धावांची भागीदारी

कोहलीची विकेट घेतल्यावर आनंद साजरा करताना केएल राहुल आणि अमित मिश्रा
कोहलीची विकेट घेतल्यावर आनंद साजरा करताना केएल राहुल आणि अमित मिश्रा

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने पॉवर प्लेमध्ये वेगवान सुरूवात करून दिली. दोघांनी 69 चेंडूंत 96 धावांची भागीदारी केली. कोहली 62 धावा करून बाद झाला आणि ही भागीदारी तुटली.

विराटचे 35 चेंडूंत अर्धशतक

विराटने 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या हंगामातील त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे. याआधी मुंबईविरोधातील सामन्यातही कोहलीने अर्धशतक केले होते. लखनऊविरोधात पॉवर प्लेमध्येच कोहलीने 42 धावा केल्या होत्या.

पॉवर प्लेमध्ये वेगवाग सुरूवात

नाणेफेक हरल्यानंतर आधी फलंदाजीला आलेल्या बंगळुरूला विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने वेगवान सुरूवात मिळवून दिली. कोहलीने स्फोटक फलंदाजी केली, तर डु प्लेसिसने त्याला संयमी साथ दिली. दोघांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूच्या पॉवर प्लेमध्ये नाबाद 56 धावा झाल्या.

दोन्ही संघातील प्लेइंग-11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, अनुज रावत, डेव्हिड विली, वेन पार्नेल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

इम्पॅक्टफूल प्लेयर : कर्ण शर्मा, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप​​​​​, मायकेल ब्रेसवेल, सोनू यादव.

लखनऊ सुपरजायंट्स : केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, अमित मिश्रा, आवेश खान, मार्क वूड, रवि बिश्नोई.

इम्पॅक्टफूल प्लेयर : आयुष बडोनी, स्वप्निल सिंह, कृष्णप्पा गौतम, प्रेरक मंकड, डॅनिएल सॅम्स.

LSG आणि RCB गेल्या वर्षी दोन वेळा आमनेसामने आले होते. दोन्ही वेळा RCB जिंकले होते.

बंगळुरूचा या हंगामातील तिसरा सामना
यंदाच्या आयपीएल हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा तिसरा सामना असेल. या संघाने एक सामना जिंकला तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यात त्याने मुंबईचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात कोलकात्याकडून पराभव पत्करावा लागला.

फाफ डू प्लेसिस, वनिंदू हसरंगा, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड विली हे बेंगळुरूविरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय विराट कोहली, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज हेही संघाला पूर्ण पाठिंबा आहे.

लखनऊ चौथ्या सामन्यासाठी उतरणार
या मोसमातील लखनौ सुपरजायंट्सचा हा चौथा सामना असेल. या संघाने दोन सामने जिंकले असून एकात पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा तर तिसऱ्या सामन्यात हैदराबादचा पराभव केला.

बेंगळुरूविरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू काइल मेयर्स, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस आणि मार्क वुड हे असू शकतात. याशिवाय केएल राहुल, रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा हेही संघाला पूर्ण ताकद देऊ शकतात.