आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब किंग्जने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 54 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बेयरस्टो आणि लिविंगस्टोनच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने 20 षटकांत 209 धावांची खेळी केली. बंगळुरुला विजयासाठी 210 धावा हव्या आहेत. मात्र, पंजाबच्या गोलंदाजीसमोर बंगळुरुचे फलंदाज टिकाव धरु शकले नाही. 20 षटकांत बंगळुरुच्या संघाने 9 गडी गमावून केवळ 155 धावा केल्या. या विजयामुळे पंजाब प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सामन्याचा तपशीलवार स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
210 धावांचा पाठलाग करताना बंगळुरुकडून विराट कोहली आणि कर्णधार डुप्लेसिसने सावध सुरूवात करत पहिल्या 3 षटकांत 30 धावा केल्या. मात्र, तिसऱ्याच षटकांत बंगळुरुला पहिला मोठा झटका बसला. विराट कोहली अवघ्या 20 धावांवर आऊट झाला. गोलंदाज कागिसो रबाडाने त्याला झेलबाद केले. विराटने 14 चेंडूनत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. त्याच्यानंतर रजत पाटीदार खेळपट्टीवर उतरला.
विराट कोहलीनंतर चौथ्याच षटकात बंगळुरुला दुसरा मोठा झटका बसला.कर्णधार डुप्लेसिसला ऋषि धवनने झेलबाद केले. डुप्लेसिस 8 चेंडूत केवळ 10 धावा काढू शकला. त्याच षटकात ऋषि धवनने बंगळुरुला तिसरा झटका दिला. महिपाल लोमरोरला अवघ्या 6 धावांवर त्याने आऊट केले. शिखर धवनने त्याचा झेल झेलला. त्यामुळे 210 धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरुची स्थिती गंभीर झाली आहे.
लोमरोरनंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेलने पंजाबचा डाव सांबाळण्याचा प्रयत्न केला. 11 षटकांपर्यंत दोघांनी पंजाबला 100 धावांपार नेले. मात्र, अकराव्या षटकात प्रथम रजत पाटीदार व नंतर मॅक्सवेलच्या रुपात पंजाबला एकामागून एक दोन मोठे झटके बसले. त्यामुळे अकराव्या षटकांत पंजाबची स्थिती पाच गडी बाद 104 धावा अशी झाली. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमदकडून बंगळुरुला अपेक्षा होत्या. मात्र, दोघांनीही निराशा केली. प्रथम 14 व्या षटकांत दिनेश कार्तिक केवळ 11 धावांवर आऊट झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात बंगळुरुची शेवटची आशा शाहबाज अहमददेखील 9 धावांवर आऊट झाला. 16 व्या षटकात राहुल चहरने बंगळुरुला आठवा झटका दिला. वानिंदु केवळ एक धाव काढू शकला. येथेच पंजाबचा विजय निश्चित झाला होता. शेवटी 20 षटकांत 9 गडी गमावून बंगळुरुची टीम केवळ 155 धावा काढू शकली.
तत्पुर्वी RCBचा कर्णधार फाफ डूप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पंजाबचा सलामीवीर जॉनी बेयरस्टोर आणि शिखर धवनने धमाकेदार सुरुवात करत पहिल्या 4 षटकांमध्येच पंजाबचा स्कोर 50 धावांवर नेला. बेयरस्टोने 13 चेंडूमध्येच तब्बल 4 षटकार लगावत 34 धावा केल्या. तर शिखर धवनने 14 चेंडूत 21 धावा केल्या.
पाचव्या षटकांत ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीने शिखर धवनला चकवा दिला. त्यामुळे 21 धावांवर असतानाच धवन क्लिन बोल्ड झाला. त्याच्यानंतर भानुका राजपाक्षे मैदानात उतरला. दुसरीकडे, सलामीवीर जॉनी बेयरस्टोरने 21 चेंडूतच धमाकेदार अर्धशतक झळकावले आहे. यासाठी बेयरस्टोने 6 षटकार आणि 3 चौकार लगावले.
सहाव्या षटकात वानिंदु हसनंगा याच्या गोलंदाजीवर भानुका राजपाक्षे झेलबाद झाला. राजपाक्षे 3 चेंडूत केवळ 1 धाव काढू शकला. हर्षल पटेलने त्याचा झेल टिपला. त्याच्यानंतर लियाम लिविंगस्टोन मैदानात उतरला आहे.
झंझावती अर्धशतकानंतर जॉनी बेयरस्टो झेलबाद झाला. 29 चेंडूतच त्याने 66 धावा कुटल्या. यात 6 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे. शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने त्याचा झेल टिपला. बेयरस्टोन आऊट झाल्यानंतर मयंक अग्रवाल आणि लियाम लिविंगस्टोन यांनी चांगली भागीदारी करत पंजाबला 150 धावांचा पल्ला गाठून दिला. मात्र, 15व्या षटकांत हर्षल पटेलने मयंकला बाद केले. हर्षलच्या गोलंदाजीवर हसनंगाने त्याचा झेल घेतला. मयंक कवेळ 19 धावा काढू शकला. मयंकनंतर फलंदाजीस उतरलेला जितेश शर्मादेखील खास खेळी करू शकला नाही. अवघ्या 9 धावांवर वानिंदु हसनंगाने त्याला त्रिफळाचीत केले.
जितेश शर्मानंतर पुढच्याच षटकात हरप्रीत बार स्वस्तात आऊट झाला. हरप्रीत केवळ 7 धावा काढू शकला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने त्याचा झेल झेलला.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या लिविंगस्टोनने शानदार अर्धशतकी खेळी केळी आहे. 42 चेंडूत त्याने धमाकेदार 70 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 4 षटकार आणि 5 षटकार लगावेल. त्याचा स्ट्राईक रेट 166.66 एवढा होता. 19 व्या षटकांत हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. दिनेश कार्तिकने त्याचा झेल झेलला. त्याच्या खेळीच्या जोरावर पंजाबने 19 षटकांतच 200 धावांचा पल्ला पार केला.
विराटचा खराब फॉर्म बंगळुरुसाठी चिंतेचा विषय
आतापर्यंतच्या सामन्यात बंगळुरुचा कर्णधार फाफ डूप्लेसिस शानदार फलंदाजी करत आहे. पण विराटचा खराब फॉर्म बंगळुरुसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंनी सामन्यात चांगली कामगिरी करणे बंगळुरूसाठी आवश्यक आहे.
रबाडाच्या गोलंदाजीमुळे पंजाबचे पारडे जड
शेवटच्या सामन्यात पंजाबचा राजस्थानविरुद्ध पराभव झाला होता. काही खडतर सामने जिंकणारा हा संघ सोपे सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडतो, असे प्रत्येक सीझनमध्ये दिसून आले आहे. यावेळी मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाबला या समस्येतून मुक्ती मिळवावी लागणार आहे.
गोलंदाज कागिसो रबाडाचे लयीत परतणे संघासाठी फायदेशीर ठरले आहे. कोणत्याही सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आतापर्यंत 18 बळी घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या या स्टार गोलंदाजाचा मयंक कसा वापर करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.