आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • RCB Vs SRH LIVE In IPL 2021: Virat Kohli David Warner AB De Villiers Glenn Maxwell | Royal Challengers Bangalore Vs Sunrisers Hyderabad LIVE Cricket Score Match 6th Latest News Update

RCB vs SRH:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून सनरायजर्स हैदराबादचा 6 धावांनी पराभव, बंगळुरूच्या शाहबाजने एका ओव्हरमध्ये घेतल्या 3 विकेट

चेन्नई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगळुरुने दिले होते 150 धावांचे आव्हान; हैदराबादने अखेरच्या 4 ओव्हरमध्ये 28 रनांवर 7 विकेट गमवल्या

IPL 2021 सीजनचा सहावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) मध्ये झाला. यात बंगळुरूने हैदराबादचा 6 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून हैदराबादला 149 धावांचे आव्हान दिले होते. सामन्याचा मराठीत स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

हैदराबादची सुरुवात चांगली झाली होती. पण, संघ चेन्नईच्या टर्निंग ट्रॅकवर अडकला. 16 व्या ओव्हरमध्ये स्कोअर 2 विकेटवर 115 रन होता. इथूनच संघाला गळती लागली. 17 व्या ओव्हरमध्ये स्पिनर शाहबाज अहमदने सामना पलटवला. शाहबाजने आपल्या ओव्हरमध्ये जॉनी बेयरस्टो(12) मनीष पांडे(38) आणि अखेरच्या बॉलवर अब्दुल समद(0) आउट केले. हैदराबादने अखेरच्या 4 ओव्हरमध्ये 28 रनांवर 7 विकेट गमवल्या.

वॉर्नरचे IPL मध्ये 49वे अर्धशतक
हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने 37 बॉलवर 54 रन काढले. वॉर्नरला काइल जेमिसनने आउट केले. वॉर्नरने आयपीएलमधील आपले 49 वे अर्धशतक लगावले. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा रेकॉर्ड वॉर्नरच्या नावे आहे.

बंगळुरुची खराब सुरुवात

आरसीबीची खराब सुरुवात झाली. एबी डिविलियर्सला रशीद खानने आउट केले. त्यापूर्वी, कर्णधार विराट कोहली 33 रनांवर आउट झाला. कोहलीला जेसन होल्डरने विजय शंकरकडे झेलबाद केले. विराट यापूर्वी मुंबईविरोधात झालेल्या पहिल्या सामन्यातही 33 रनांवर आउट झाला.

विराट आणि मॅक्सवेलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 44 रनांची पार्टनरशिप झाली. दोघांनी चेन्नईच्या स्पिनिंग ट्रॅकवर स्पिनरलाच टार्गेट केले. यापूर्वी भुवनेश्वर कुमारने देवदत्त पडिक्कलला आउट केले. यानंतर शाहबाद अहमद शहबाज नदीमच्या बॉलवर आउट झाला.

दोन्ही संघ

बंगळुरू : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, शाहबाज अहमद, ग्लेन मैक्सवेल, एबी डिविलियर्स, डैनियल क्रिश्चियन, काइल जेमिसन, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

हैदराबाद : डेविड वॉर्नर, ऋद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो, विजय शंकर, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि शाहबाज नदीम.

बातम्या आणखी आहेत...