आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022:रिंकू-राणाच्या 38 चेंडूंमध्ये 66 धावा; कोलकाताची राजस्थानवर 7 गड्यांनी मात; 5 पराभवानंतर केकेआरचा चौथा विजय

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर रिंकू सिंग ( ४२) व नितीश राणाने ( ४८) ३८ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी करून कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या पराभवाची मालिका खंडित केली. त्यामुळे कोलकाता संघाला आयपीएलमध्ये सोमवारी चौथ्या विजयाची नाेंद करता आली. सलगच्या पाच पराभवातून सावरलेल्या श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघाने लीगमधील आपल्या दहाव्या सामन्यामध्ये संजू सॅमसनच्या राजस्थान संघाचा पराभव केला. उपविजेत्या कोलकाता संघाने १९.१ षटकांत ७ गड्यांनी रोमहर्षक विजय संपादन केला. यासह राजस्थानला चौथ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. कर्णधार सॅमसनच्या (५४) अर्धशतकाच्या बळावर राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५२ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने तीन गड्यांच्या माेबदल्यात सामना जिंकला.

व्यंकटेश-चक्रवर्थीचे भविष्य अनिश्चित!
गत उपविजेत्या कोलकाता संघाच्य व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्थीचे भविष्य अनिश्चित असल्याचे दिसते. या दाेघांनाही सत्राच्या पहिल्याच आठवड्यात रिटेन करण्यात आले होते. मात्र, अद्यापही दाेघांनी संघाची निराशा केली आहे. मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्थीला अद्याप छाप पाडताआली नाही. तसेच व्यंकटेशही सुमार खेळी करत आहे.

सॅमसनचे कोलकाता संघाविरुद्ध तिसरे अर्धशतक
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने कोलकाता टीमविरुद्ध झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याने ५४ धावांची खेळी केली. त्याने यंदा सत्रात दुसरे, करिअरमधील १७ वे व कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध तिसरे अर्धशतक झळकावले आहे.

धावफलक, नाणेफेक कोलकाता (गोलंदाजी)
राजस्थान रॉयल्स धावा चेंडू ४ ६
बटलर झे.शिवम गो. साउथी २२ २५ ०३ ०
देवदत्त पड्डिकल झे.गो. उमेश ०२ ०५ ०० ०
सॅमसन झे.रिंकू गो. शिवम ५४ ४९ ०७ १
करुण नायर झे.रिंकू गो. अनुकूल १३ १३ ०१ ०
पराग झे.अनुकूल गो. साउथी १९ १२ ०१ २
शिमरोन हेटमेयर नाबाद २७ १३ ०१ २
आर. अश्विन नाबाद ०६ ०५ ० ०
अवांतर : ०९, एकूण : २० षटकांत ५ बाद १५२ धावा. गोलंदाजी : उमेश यादव ४-१-२४-१, अनुकूल रॉय ४-०-२८-१, सुनील नरेन ४-०-१९-०, शिवम मवी ४-०-३३-१, टीम साउथी ४-०-४६-२.
कोलकाता नाइट रायडर्स धावा चेंडू ४ ६
इंद्रजीत झे.अश्विन गो. प्रसिध १५ १६ ०२ ०
अॅरोन फिंच त्रि.गो. कुलदीप ०४ ०७ ०० ०
श्रेयस झे. सॅमसन गो. बाेल्ट ३४ ३२ ०३ १
नितीश राणा नाबाद ४८ ३७ ०३ २
रिंकू सिंग नाबाद ४२ २३ ०६ १
अवांतर : १५, एकूण : १९.१ षटकांत ३ बाद १५८ धावा. गोलंदाजी : ट्रेंट बाेल्ट ४-०-२५-१, प्रसिध कृष्णा ४-०-३७-१, कुलदीप सेन ३.१-०-२८-१, आर.अश्विन ४-०-३३-०, युजवेंद्र चहल ४-०-३१-०.
सामनावीर : रिंकू सिंग

आयपीएल-2022 गुणतालिका
टीम लढत विजय पराभव टाय एन/आर गुण रनरेट
गुजरात टायटन्स 09 08 01 00 00 16 +0.377
लखनऊ सुपरजायंट्स 10 07 03 00 00 14 +0.397
राजस्थान रॉयल्स 10 06 04 00 00 12 +0.340
सनरायझर्स हैदराबाद 09 05 04 00 00 10 +0.471
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10 05 05 00 00 10 -0.558
दिल्ली कॅपिटल्स 09 04 05 00 00 08 +0.587
कोलकाता नाइट रायडर्स 10 04 06 00 00 08 -0.060
पंजाब किंग्ज 09 04 05 00 00 08 -0.470
चेन्नई सुपरकिंग्ज 09 03 06 00 00 06 -0.407
मंुबई इंडियन्स 09 01 08 00 00 02 -0.836

बातम्या आणखी आहेत...