आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांचे लक्ष्य. जवळजवळ अशक्य पण इथे एक नाव चमकले, जे आता प्रत्येकाच्या ओठावर आहे... रिंकू सिंह. रिंकूने सलग 5 चेंडूत 5 षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला.
त्याने केवळ विजय मिळवून दिला नाही तर अनेक विक्रमही मोडले. रिंकूपूर्वी, कोणत्याही खेळाडूने T20 लीग किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 20 व्या षटकात सलग 5 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला नव्हता. शेवटच्या षटकात सर्वाधिक 29 धावा देऊन विजयाचा विक्रमही त्याने केला. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने 20 व्या षटकात 23 धावा देत चेन्नईला विजय मिळवून दिला होता.
रिंकूला कोलकाताने 80 लाख रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला फक्त 20 लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. तेही त्याच्यासाठी पुरेसे होते, कारण त्याचे कुटुंब गरीब होते.
रिंकू आज आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय स्टार आहे, पण एक काळ असा होता जेव्हा रिंकू सिलिंडर पोहोचवायचे काम करत होता. गरीबी एवढी होती की, झाडू मारण्याची वेळ आली होती.
एक फोटो पाहा आणि नंतर वाचा रिंकू सिंहची कहाणी...
केकेआरला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने त्याच्या आयुष्याविषयी सांगितले. तो म्हणाला की, ‘आम्ही कुटुंबात 5 भाऊ आहोत. वडील सिलिंडर डिलिव्हरीचे काम करायचे. आम्ही पाचही भावांकडून काम करून घ्यायचे, कोणी सापडले नाही तर काठीने मारायचे. सर्व भाऊ दुचाकीवर दोन-दोन सिलिंडर दुकान किंवा घरी पोहोचवत होतो. सर्व मिळून मॅच असेल तिथे खेळायला जात होतो.
वस्तीत आणखी 6-7 मुलं होती, ज्यांच्यासोबत एकत्र पैसे जमा करुन बाूल आणयचो. टेनिस आणि लेदर बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील मॉडर्न स्कूलमधूनही क्रिकेट खेळले. आंतरशालेय स्पर्धेत 32 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी खेळली.
सुरुवातीला क्लब क्रिकेट खेळायला पैसे नसल्यामुळे सरकारी स्टेडियममध्ये कार्ड बनवून सराव करायचो. मॅचेस खेळण्यासाठी पैसे लागायचे, घरच्यांना विचारले की, तर तू अभ्यास कर, असे ते सांगायचे.
पप्पा मला नेहमी खेळायला मनाई करायचे, मम्मी साथ देत होती. शहराजवळ एक स्पर्धा होती, त्यासाठी पैशांची गरज होती. मम्मीने दुकानातून एक हजार रुपये उधार घेवून दिले होते.
रिंकूच्या कथेत पुढे जाण्यापूर्वी जाणून घ्या. 5 षटकार मारल्यानंतर तो काय म्हणाला आणि पाहा फोटो...
सामन्यानंतर रिंकू म्हणाल की, ‘मी एका शेतकरी कुटुंबातून आलो आहे आणि माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केला. मी मैदानाबाहेर मारलेले सर्व शॉट्स माझ्यासाठी आतापर्यंत ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांना समर्पित आहे.’
केकेआरच्या विजयानंतर अलीगड स्टेडियमजवळील 2 खोल्यांचे छोटेसे घर सर्वत्र चर्चेत आहे. यामध्ये रिंकू आपल्या 5 भावंड आणि आई-वडिलांसोबत राहत होता. आता आयपीएलमध्ये त्याच्या आगमनानंतर सर्व काही बदलले आहे.
रिंकूने आयपीएल निवडीचा किस्साही सांगितला. रिंकूने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मला वाटले होते की मी 20 लाखांत जाईन, पण मला 80 लाखांत विकत घेतले गेले. सर्वात आधी मनात आले की, मोठ्या भावाच्या लग्नात काही खर्च करेल, बहिणीच्या लग्नासाठी काही जमा करुन ठवेल, आणि एका चांगल्या घरात शिफ्ट होईल.’
3 वर्षांपूर्वी कुटुंबावर 5 लाखांचे कर्ज होते. कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या. हे आमच्या आवाक्याबाहेर होते. मी 9वी नापास आहे. मला माहित आहे ककी माझ्यासाठी क्रिकेट ही एकमेव संधी आहे.
जेव्हा मीत यूपीच्या 19 वर्षाखालील संघात खेळत होता, तेव्हा तिथून मिळालेले पैसे या कर्जाची परतफेड करण्यासाठी जात होते. 2 वर्षांपूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील संघातही संधी मिळाली होती पण अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकलो नव्हतो. कौटुंबिक अडचणी पाहता संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करावे लागले.
रिंकू म्हणतो- आयुष्यात खूप संघर्ष केला, देव त्या दिवसांची भरपाई करतोय असं वाटतं.
रिंकूने सांगितले की, "दिल्लीतील एका स्पर्धेत मालिकावीर ठरल्यानंतर मोटारसायकल मिळाल्यावर कुटुंबाचाही विश्वास बसू लागला. लवकरच यातूनही सिलिंडरची डिलिव्हरी सुरू झाली. नातेवाइकांचे म्हणणे होते की, भावासोबत काम करायला सुरुवात करावी. भावाला सांगितले की, काही काम मिळवून दे. त्याने मला कोचिंगमध्ये झाडू मारण्याचे आणि फर्शी पुसण्याचे काम मिळवून दिले. मी नकार दिला. मला माहित होते की क्रिकेट माझ्यासाठी सर्व काही आहे. तिथून मी फक्त खेळावर लक्ष केंद्रित केले. क्रिकेट हा एकमेव पर्याय होता.
प्रशिक्षकाने मदत केली, पहिली किट दुसऱ्याने दिली...
रिंकू म्हणाला की, "लहानपणी जेव्हा मी चांगले खेळू लागलो तेव्हा मला इतर संघांमध्ये संधी मिळू लागल्या. त्यासाठी पैसेही लागत नव्हते, प्रशिक्षक मसूद अमिनी सरांनीही मला खूप सपोर्ट केला. मोहम्मद झीशान भैया यांनी मला क्रिकेट किट मिळवून दिली. 2010-11 मध्ये उत्तर प्रदेश राज्य अंडर- 16 सांघिक चाचण्या दिल्या, पण पहिल्या फेरीत बाहेर पडलो.
2012 मध्ये पहिल्यांदा 16 वर्षाखालील संघात निवड झालेल्या पहिल्याच सामन्यात 154 धावा केल्या. अंडर-19 संघात निवड झाल्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्येही पदार्पण केले. येथून पुन्हा विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी खेळण्यास सुरुवात झाली.
देशांतर्गत क्रिकेटमुळे माझ्यवर अनेकांनी लक्ष देण्यास सुरूवात केली. 2021 मध्ये पंजाब किंग्जने विकत घेतले पण संपूर्ण हंगाम बेंचवर घालवला. यानंतर मुंबई इंडियन्सने निवड चाचणीसाठी बोलावले. तिथे 31 चेंडूत 91 धावा केल्या. मला वाटले मी प्रभाव पाडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होतो.
मला आशा होती की कोणीतरी मला विकत घेईल. पण इतके पैसे देऊन मला विकत घेईल असे कधीच वाटले नव्हते. एवढा पैसा माझ्या कुटुंबात कोणीही पाहिला नाही.”
रिंकूचे 5 षटकार आणि त्याची कहाणी...
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि आयपीएलचा गतविजेते गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. यात गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने 19 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या.
KKR ला शेवटच्या 6 चेंडूत 29 धावांची आवश्यकता होती.
केवळ 3 सामन्यांत त्याने स्वत:ला सिद्ध केले
2022 च्या मेगा लिलावात केकेआरने रिंकूला 55 लाख रुपयांना विकत घेतले. त्या मोसमात 7 सामन्यात त्याने 148.72 च्या स्ट्राईक रेटने 174 धावा केल्या. यावेळी आयपीएलच्या 3 सामन्यात रिंकूने 168.97 च्या स्ट्राईक रेटने 98 धावा केल्या आहेत. यामध्ये गुजरातविरुद्धची मॅच-विनिंग इनिंग आणि बेंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शार्दुल ठाकूरसोबत 103 धावांची भागीदारी यांचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.