आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या विजयाचा हिरो ठरलेली रिंकू सिंग कर्णधार नितीश राणाच्या बॅटने फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. रिंकूचे वडील खानचंद यांनी रविवारी झालेल्या रिंकूच्या खेळीबाबत ANIशी संवाद साधला. ही रिंकूची मेहनत असल्याचे त्यांनी सांगितले.
रिंकू स्वतःच्या बळावर इथपर्यंत पोहोचला - खानचंद
ही रिंकूची मेहनत असल्याचे रिंकूच्या वडिलांनी सांगितले. तो स्वबळावर इथपर्यंत पोहोचला आहे. आजपर्यंत मी बॅट किंवा क्रिकेटचे कोणतेही साहित्य खरेदी करून त्याला दिलेले नाही. मी त्याला नेहमीच क्रिकेट खेळण्यास मनाई केली आणि फक्त अभ्यास करण्यास सांगितले. रिंकूचे अभ्यासावर अजिबात लक्ष नव्हते आणि तो फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असे.
नंतर मी त्याला असेही सांगितले की, तुला क्रिकेट खेळायचे असेल तर फक्त क्रिकेट खेळ. स्थानिक स्पर्धांमध्ये तो धावा काढत असे. लोक म्हणायचे की तो नंतर खूप चांगले खेळेल. अखेर त्याने करून दाखवले. रविवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या त्याच्या फलंदाजीमुळे मी खूश आहे. त्याने भविष्यात देशासाठी खेळावे अशी माझी इच्छा आहे.
आता ही बॅट रिंकूची झाली- नितीश राणा
खरे तर रिंकू सिंगने सामन्याच्या शेवटच्या षटकात ज्या बॅटने सलग पाच षटकार मारले, ती बॅट नितीश राणाची होती. खुद्द नितीश राणा याने ही माहिती दिली आहे. केकेआरने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये नितीश राणा हातात बॅट धरलेला दिसत आहे.
याच बॅटने रिंकूने गुजरात टायटन्सचे होम ग्राउंड अहमदाबाद येथे शेवटच्या षटकात 5 षटकार तडकावून गुजरातच्या तोंडातून सामना हिसकावून घेतला. या मोसमातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने याच बॅटने फलंदाजी केल्याचे राणा व्हिडिओमध्ये सांगत आहे. T20 विश्वचषक, मुश्ताक अली आणि IPLच्या गेल्या मोसमातही तो याच बॅटने खेळला होता. रिंकूला ही बॅट द्यायची नव्हती, असे तो व्हिडिओमध्ये सांगत आहे, पण रिंकूने या बॅटने मोठा खेळ केला. ही बॅट खूप हलकी आहे. नितीश म्हणाला की, आता ही बॅट रिंकूचीच झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.