आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Rishabh Pant IPL Record; Delhi Capitals Captain Will Overtake Sachin Tendulkar Virendra Sehwag And Yuvraj Singh; News And Live Updates

IPL मध्ये पंत सचिन आणि द्रविडला मागे टाकणार:धावांच्या बाबतीत सेहवाग-युवराजचा विक्रम मोडेल ऋषभ पंत; यष्टिरक्षक गिलख्रिस्टलाही मागे सोडणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएल 2016 च्या सत्रात पर्दापण करणाऱ्या ऋषभ पंतने 68 सामन्यांमध्ये 2079 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2021 मध्ये भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पहिल्यावेळेस कर्णधार म्हणून खेळणार आहे. त्याच्याकडे दिल्ली कॅपिटल्स (DC)संघाची कर्णधार पदाची कमान सोपविण्यात आली आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावांच्या बाबतीत सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, जॅक कॅलिस, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंहला मागे टाकण्याची संधी आहे. तर दुसरीकडे, विकेटकीपिंगमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार ॲडम गिलख्रिस्टलादेखील पंम मागे टाकू शकतो.

आयपीएल 2016 च्या सत्रात पर्दापण करणाऱ्या ऋषभ पंतने 68 सामन्यांमध्ये 2079 धावा केल्या आहेत. तर यापूर्वी राहुल द्रविडने 89 सामन्यात 2174 धावा आण‍ि सचिन तेंडूलकरने 78 सामन्यात 2334 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिसने 98 सामन्यात 2427 धावा केल्या आहेत. परंतु, विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू सध्या आयपीएलमधून निवृत्त झालेले आहे. त्यामुळे ऋषभ पंत धावांच्या बाबतीत या खेळाडूंचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

सेहवाग-युवराजला मागे टाकण्याची संधी
आयपीएलच्या 14 व्या सत्राची 9 एप्रिलपासून सुरु होत असून 30 मेपर्यंत चालणार आहे. यामध्ये पंतने जर 672 धावा केल्या तर तो वीरेंद्र सेहवाग आण‍ि युवराज सिंह यांचा विक्रम मोडू शकतो. कारण आयपीएल लीगमध्ये सेहवागने 104 सामन्यात 2728 धावा तर युवराजने 132 सामन्यात 2750 धावा केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...