आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्सकडून करण्यात आलेला सन्मान हा बीसीसीआयला आवडला नाही. खरे तर पहिल्या सामन्यात पंतच्या सन्मानार्थ त्याची जर्सी पॅव्हेलियनच्या वर लटकण्यात आली होती. परंतू यावर BCCI ने नाराजी व्यक्त केली.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रानुसार, बीसीसीआयला दिल्ली कॅपिटल्सचा सन्मान करण्याचा हा प्रकार आवडला नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, असा सन्मान एखाद्या मोठ्या कार्यक्रमानंतर किंवा निवृत्तीनंतर दिला जातो. पंतच्या बाबतीतही तसे झालेले नाही. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सने आतापासून असे करू नये.
गुजरातविरुद्धचा सामना पाहण्यासाठी येऊ शकतो पंत
ऋषभ पंत मंगळवारी दिल्लीत गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना पाहण्यासाठी येऊ शकतो. यासाठी फ्रेंचायझीला बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा विभागाची परवानगी घ्यावे लागेल. परवानगी मिळाल्यास ऋषभ डगआउटमध्येही बसू शकतो.
आयपीएलच्या एका सूत्राने PTIला दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ हा नेहमीच दिल्ली कॅपिटल्ससाठी संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात तो संघात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. संघमालकासह तो व्हीआयपी बॉक्समध्ये असेल, पण काही काळासाठी तो डगआऊटमध्येही येण्याची शक्यता आहे.
दिल्लीचा संघ पंतच्या नंबरच्या जर्सीसमवेत खेळणार
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात दिल्ली कॅपिटल्स वेगळी जर्सी घालून खेळते. या हंगामातही संघ आयपीएलमधील सामन्यादरम्यान प्रत्येक जर्सीवर पंतचा क्रमांक घेऊन खेळेल. यासोबतच संघाच्या जर्सीचा रंगही वेगळा असेल. तथापि, जर्सीच्या एका कोपऱ्यात हा क्रमांक लहान अक्षरात असेल, यामुळे खेळाडूंच्या संख्येच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही.
पंतने दिल्लीसाठी 35 च्या सरासरीने केल्या धावा
पंतने दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत 98 सामने खेळले असून, त्याने 34.61 च्या सरासरीने 2,838 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि 15 अर्धशतके केली आहेत.
गतवर्षी पंतच्या कारला झाला होता अपघात
खरं तर, यावेळी ऋषभ पंत 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात असताना पंत यांच्या कारला अपघात झाला होता. त्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल. सध्या त्यांचे पुनर्वसन सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.