आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त:धोनीच्या रणनीतीमुळे मला त्रास होत असे, प्रचंड संताप यायचा ;CSK च्या माजी प्लेयरचा खुलासा, म्हणाला- माहीभाई म्हणजे...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड क्रिकेटमध्ये एस. एस. धोनीला रणनीतीकार खेळाडू व कॅप्टन म्हणून ओखळले जाते. त्याच्या मॅचमधील प्लॅनिंगमुळे अनेक दिग्गज संघ प्लॉप ठरले. 2011 मध्ये भारताला विश्वचषक मिळवून देणारा धोनी आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली CSKने 4 वेळा मिळवला विजय

धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये IPL चे विजेतेपद पटकावले आहे. यावेळीही चाहत्यांना आशा आहे की, माही भाईच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी होईल. दरम्यान, धोनीसोबत सीएसकेमध्ये खेळलेला क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने धोनीच्या रणनीतीविषयी आपले मत व्यक्त केले.

रॉबिन म्हणाला की, माहीभाईची विरूद्ध संघाबद्दलची रणनीती अशी आहे की, तुम्ही स्वतःवरच संतापून जाता. त्यामुळे तुम्ही इच्छा नसतानाही चुका होतात. उथप्पा देखील IPL मध्ये माही विरुद्ध खेळला आहे. यामुळेच उथप्पाने धोनीच्या रणनीतीबाबत आपले परखड मत मांडले.

माही भाई फलंदाजांच्या मनाने खेळतो- रॉबिन उथप्पा

धोनीबद्दल सीएसकेचा माजी फलंदाज म्हणाला, माही भाई फलंदाजांच्या मनाने खेळतो, तो फक्त फलंदाजांना वेगळा विचार करायला भाग पाडत नाही, तर गोलंदाजांनाही वेगळा विचार करायला भाग पाडतो. तो गोलंदाजाला अशा स्थितीत ठेवतो की, गोलंदाजही विकेट घेण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणे म्हणजेच खूप काही शिकण्यासारखेच आहे.

CSKचे दोन सामने, एकात हार एक जीत
यंदाच्या आयपीएलमध्ये CSK ने IPL मध्ये 2 सामने खेळले आहेत. एकात विजय आणि एकात पराभवाचा सामना केला आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात, गुजरातला CSK कडून पराभव पत्करावा लागला, तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. आता CSK आपला पुढचा सामना आज म्हणजे 8 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.