आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPLमध्ये रविवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना झाल्यापासून रिंकू सिंह सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे. त्याच्यासोबतच इंग्रजी समालोचक रोहन गावसकरदेखील ट्रेंड करत होते. सामन्याच्या शेवटी रोहन यांची कॉमेंट्री क्रिकेट चाहत्यांना आवडली नसल्याने ते ट्रेंड झाले. रोहन यांच्या कॉमेंट्रीमुळे या अविस्मरणीय सामन्याची मजाच गेल्याचे चाहत्यांनी सांगितले. आतापर्यंत चाहते सोशल मीडियावर रोहन गावसकरबद्दल पोस्ट करत आहेत. रोहन यांना कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकावे, अशी क्रिकेट चाहत्यांची मागणी आहे.
चाहत्यांनी का केली अशी मागणी?
वास्तविक, केकेआरला गुजरात टायटन्सविरुद्ध 5 चेंडूंत 29 धावांची गरज असताना रिंकू सिंहने 5 चेंडूंत 5 षटकार खेचून सामना जिंकला. IPLच्या इतिहासात एखाद्या फलंदाजाने सामन्याच्या शेवटच्या 5 चेंडूंत 5 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची ही पहिलीच वेळ होती. इथे क्रिकेट चाहत्यांना उत्साहाने भरलेली कॉमेंट्री हवी होती. चाहत्यांना इथे रिंकू सिंहचे कौतुक ऐकायचे होते, पण रोहन गावसकर यांनी या अविस्मरणीय क्षणांवर अगदी सौम्य शब्दांत भाष्य केले. रिंकू सिंहच्या मेहनतीचे कौतुक करण्याऐवजी तो केकेआरच्या विजयाचे कारण यश दयालच्या चुका सांगत होते. ही एकमेव गोष्ट आहे जी चाहत्यांना अजिबात आवडली नाही.
काय म्हणाले रोहन गावसकर?
रिंकू सिंहने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून संघाला विजय मिळवून देताच रोहन गावसकर म्हणाले, 'म्हणूनच मी टी-20 क्रिकेटला गोलंदाजांचा खेळ म्हणतो. त्याने (यश दयाल) तिथे खूप वाईट गोलंदाजी केली, पण आपण रिंकू सिंहबद्दल बोलत आहोत, त्याने किती अप्रतिम फलंदाजी केली. मागच्या दिवशी आम्ही बोलत होतो की जर एखाद्या फलंदाजाने जितके चेंडू खेळले तितक्या धावा केल्या किंवा त्याचा स्ट्राईक रेट फक्त 120 पर्यंत असेल तर तुम्ही त्याच्यावर टीका करता. आज एका गोलंदाजाने 31 धावा दिल्या आणि तुम्ही म्हणताय की रिंकू सिंहने ते केले. त्याने सर्व कौतुक घेतले. आणि म्हणूनच मी म्हणतो की हा खेळ गोलंदाजांचा आहे."
या सामन्याच्या सुरुवातीला रिंकू सिंहला 100च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नसल्यामुळे रोहन यांनी असे म्हटले असावे. गोलंदाजी खूप अचूक होत असल्याने हे घडत होते. पण यश दयालने शेवटच्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक फुल टॉस टाकताच रिंकूने ते सीमापार पाठवायला सुरुवात केली. इथे रिंकूचा मोमेंटम बनला आणि पुढे त्याने यश दयालचे दोन शॉर्ट पिच स्लोअर बॉलही सिक्समध्ये रूपांतरित केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.