आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Royal Challengers Bangalore And Rajasthan Royals Will Take On Rajasthan In The Semi finals Today. 7.30 P.m. Will Meet\ Marathi News

IPL मॅच प्रिव्ह्यू:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे लक्ष्य विजयी शतकाकडे, लयीत असलेल्या राजस्थान रॉयल्सशी आज होणार लढत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा १३ वा सामना खेळण्यासाठी उतरेल, तेव्हा त्याचे लक्ष आपल्या १०० व्या विजयाकडे असेल. संघाने मंगळवारी राजस्थान राॅयल्सविरुद्ध विजय मिळवल्यास संघाचा आयपीएलचा १०० वा विजय ठरेल. अशी कामगिरी करणारा मुंबई, चेन्नई, केकेआरनंतर चौथा संघ बनेल. बंगळुरूचे आतापर्यंत २१३ पैकी ९९ विजय आहेत. त्याचे ३ सामने ड्रॉ, ५ अनिर्णीत, २ रद्द झाले आहेत. दुसरीकडे, राजस्थान संघ सत्रातील आपली लय कायम ठेवण्यास मैदानात उतरेल. राजस्थानने २ सामने खेळले आणि दोन्ही जिंकले. तर, बंगळुरूने २ सामन्यांत १ जिंकला व १ गमावला. दोन्ही संघांत आतापर्यंत २५ सामने खेळवण्यात आले, ज्यात १२ सामने बंगळुरूने व १० सामने राजस्थानने आपल्या नावे केले. तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. दोन्ही संघांतील गत ५ पैकी ४ सामने बंगळुरूने जिंकले आहेत. वानखेडेची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करते, त्यामुळे दोन्ही संघ त्याचा फायदा घेऊ इच्छितात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
सलामीवीरांमध्ये सातत्याची आवश्यकता

*फलंदाजी : संघासाठी फलंदाजी चिंतेचा विषय आहे. सलामीवीर अनुज रावतला आपल्या खेळात सातत्य आणावे लागेल. कर्णधार डुप्लेसिसला आघाडीवर खेळावे लागेल आणि मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. त्याने पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध अर्धशतक केले होते. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या सामन्यासाठी उपलब्ध आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिसऱ्या स्थानी कोहलीला जबाबदारीने खेळावे लागेल.

*गोलंदाज : गोलंदाजीमध्ये अधिक अडचण नाही. गत सामन्यात केकेआरविरुद्ध श्रीलंकन लेग स्पिनर हसरंगाच्या नेतृत्वात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. आता सॅमसन व कंपनीला रोखण्यासाठी हसरंगा महत्त्वाचा ठरू शकताे. वेगवान गोलंदाज डेव्हिड व्हिले, आकाश दीप, सिराजला लयीत येण्याची गरज आहे.

राजस्थान रॉयल्स : फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही फाॅर्मात *फलंदाजी : गत सामन्यात शतक करणारा सलामीवीर जोस बटलर शानदार लयीत आहे. त्याला सहकारी फलंदाज देवदत्त पड्डीकल व यशस्वी जैस्वालच्या साथीची गरज आहे. पहिल्या सामन्यात अर्धशतक करणारा कर्णधार संजू सॅमसन मुंबईविरुद्ध चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरला. त्याला सातत्य राखावे लागेल. कॅरेबियन हिटरने पहिल्या दोन सामन्यांत योगदान दिले होते. त्यांना फलंदाजीची संधी मिळाली, तर ते बंगळुरूसाठी घातक ठरू शकतात.

* गोलंदाजी : संघ आपल्या गोलंदाजीत काही बदल करण्याची शक्यता नाही. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनीने चांगली कामगिरी केली होती. गत सामन्यात चहलने सामना फिरवला होता. त्याला अश्विनने साथ दिली होती. या सामन्यात अश्विन व चहलची जोडी धोकादायक ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...