RR vs GT फँटसी-11 गाइड:शमीकडे पर्पल कॅप, गिल-बटलर मिळवून देऊ शकतात जास्त गुण
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील आजचा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल.
या बातमीत जाणून घ्या, फॅन्टसी-11 च्या अव्वल खेळाडूंबद्दल. त्यांचा आयपीएल रेकॉर्ड आणि भूतकाळातील कामगिरी, ज्यावरून तुम्ही तुमच्या संघात कोणाचा समावेश करू शकता…
विकेटकिपर
संजू सॅमसनला यष्टिरक्षक म्हणून घेतले जाऊ शकते.
- सॅमसनने आतापर्यंतच्या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. 9 सामन्यात 212 धावा केल्या आहेत. त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.
फलंदाज
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि शिमरॉन हेटमायर यांना फालंदाजांमध्ये घेता येईल.
- बटलर हा आक्रमक फलंदाज आहे. तो जवळपास प्रत्येक सामन्यात आपली सर्वोत्तम कामगिरी करतो. 9 सामन्यात 289 धावा केल्या आहेत. आतापर्यंत 3 अर्धशतके केली आहेत.
- जैस्वाल मोठी खेळी खेळू शकतो. 9 सामन्यात 428 धावा केल्या आहेत. त्याने 3 अर्धशतके केली आहेत. जैस्वालचा स्ट्राइक रेट 155 पेक्षा जास्त आहे.
- शुभमन गिल अव्वल फॉर्मात आहे. अहमदाबादच्या सपाट खेळपट्टीवर चांगली कामगिरी करतो. 9 सामन्यात 140 च्या स्ट्राइक रेटने 339 धावा केल्या आहेत. 3 अर्धशतकेही झळकावली आहेत.
- हेटमायरने 9 सामन्यात 41 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 155 आहे. अर्धशतकही केले आहे.
ऑलराउंडर
आर अश्विन, विजय शंकर आणि हार्दिक पंड्याला अष्टपैलू खेळाडूमध्ये घेतले जाऊ शकते.
- अश्विन वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. गोलंदाजीतून 9 सामन्यात 13 बळी घेतले आहेत.
- विजय शंकरने 7 सामन्यात 41 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 2 अर्धशतकेही केली आहेत.
- हार्दिक पंड्या हा अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. गोलंदाजी आणि आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीही करतो. 8 सामन्यात 213 धावा करण्यासोबतच त्याने 2 बळीही घेतले आहेत.
बॉलर
राशिद खान, मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांना गोलंदाज म्हणून घेतले जाऊ शकते.
- राशिद खानने आतापर्यंत 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत.
- मोहम्मद शमीने 9 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तो गुजरातचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
- चहल सध्या राजस्थानकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.
कर्णधार कोणाला बनवावे?
यशस्वी जैस्वालची कर्णधारपदी निवड होऊ शकते. सध्या अव्वल फॉर्ममध्ये आहे. राशिद खानला उपकर्णधार बनवले जाऊ शकते.
टीप : अलीकडील रेकॉर्ड आणि संभावनांच्या आधारे माहिती दिली आहे. हे मूल्यांकन सामन्यात योग्य किंवा चुकीचे असू शकते. संघ निवडताना फँटसी लीगशी संबंधित जोखीम लक्षात ठेवा.