आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान Vs हैदराबाद:4 पराभवानंतर हैदराबादला मिळाला विजय, राजस्थानला दिली 7 गड्यांनी मात; रॉय-विलियमसनचे अर्धशतक

दुबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएल -2021 मध्ये प्लेऑफ गाठण्यासाठी SRH ची टीम स्पर्धेबाहेर आहे.

IPL 2021 फेज-2 मध्ये सोमवारी सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये मॅच खेळली गेली. जी हैदराबादने शानदार खेळ खेळत 7 विकेटने जिंकून आपल्या नावे केली. मॅचमध्ये SRH समोर 165 धावांचे टार्गेट होते. जे टीमने 9 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. मॅचचे लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

SRH ला मिळाली होती जबरदस्त सुरुवात
टार्गेटचा पाठलाग करत SRH ची दमदार सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी जेसन रॉय आणि ऋद्धिमान साहाने 31 चेंडूंवर 57 धावा काढल्या. साहा (18) धावा काढून महिपाल लोमरोरच्या चेंडूवर स्टंप आउट होऊन पवेलियमध्ये परतला.

सॅमसनचा कर्णधारपदाचा डाव
संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करताना सलग दुसरे अर्धशतक झळकावले. आरआर कर्णधाराने 57 चेंडूत 82 धावांची दमदार खेळी खेळली. या खेळीसह, सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून 2500+ धावा करणारा अजिंक्य रहाणे (3098) नंतर दुसरा खेळाडू बनला. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये 3 हजार धावा करणारा संजू 19 वा खेळाडू ठरला. सॅमसनने या सीजनमध्ये 433 धावा केल्या आहेत आणि यासह ऑरेंज कॅपही त्याच्याकडे आली आहे.

भुवीने पहिल्या चेंडूवर दिले यश
RR साठी पहिला विकेट एविन लेविस (6) च्या रुपात पडली. त्यांची विकेट भुवनेश्वर कुमारच्या खात्यात आली. भुवीने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर लेविसला अब्दुल समदच्या हातांनी कॅच आउट करत हैदराबादला मोठे यश मिळवून दिले.

आयपीएल -2021 मध्ये प्लेऑफ गाठण्यासाठी SRH ची टीम स्पर्धेबाहेर आहे. या संघाला अजून 5 सामने खेळायचे आहेत आणि यामुळे अनेक संघांचे समीकरण बिघडू शकते. त्यामुळे आजच्या सामन्यात आरआरला हैदराबादविरुद्ध सावध राहण्याची गरज आहे. राजस्थानचे सध्या नऊ सामन्यांमध्ये 8 गुण आहेत.

फेज -2 मध्ये राजस्थानला 1 विजय आणि 1 पराभव मिळाला
IPL-2021 फेज -2 मध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पंजाबविरुद्ध युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीच्या मजबूत शेवटच्या षटकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. मात्र, संघाला दिल्लीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे हैदराबादने या टप्प्यात दोन सामने गमावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...