आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL सुपर संडे:RR ची SRH वर 72 धावांनी मात; हैदराबादचा 131 धावांतच खुर्दा; चहलचे 4 बळी

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थानच्या संघाने हैदराबाद संघावर 72 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. राजस्थानने 5 गडी गमावून उभारलेले 204 धावांचे आव्हान गाठताना हैदराबादची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. पहिल्याच षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर चाचपडतानाच दिसले. हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 131 धावाच करता आल्या. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्यानंतर मयांक अग्रवालने 27 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून चहलने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने 2 आणि आर अश्विन व जेसन होल्डरने प्रत्येकी एक बळी घेतला.

राजस्थानच्या टीमने 10 व्यांदा 200 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर डिफेंड केला आहे. हा राजस्थानचा हैदराबादवरील 9वा विजय आहे. दोन्ही टीम 17 वेळा आमने-सामने आलेल्या आहेत. हैदराबादने 8 विजय मिळवले आहेत.

अशा पडल्या हैदराबादच्या विकेट...

 • पहली: पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने अभिषेक शर्माला बोल्ड केले.
 • दूसरी : पहिल्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर बोल्टने राहुल त्रिपाठीला जेसन होल्डरच्या हातात झेलबाद केले.
 • तिसरी : 7 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहलने हॅरी ब्रूकला बोल्ड केले.
 • चौथी : नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जेसन होल्डरने सुंदरला हेटमायरच्या हातात झेलबाद केले.
 • पाचवी : दहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अश्विनने लेन फिलिप्सला आसिफच्या हातात झेलबाद केले.
 • सहावी : 11 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहलने मयांक अग्रवालला बटलरच्या हातात झेलबाद केले.
 • सातवी: 14 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहलने आदिल रसीदला सॅसमसनच्या हाताने स्टंपिंग बाद केले.
 • आठवी : 18 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर चहलने भुवनेश्वर कुमारला बोल्ड केले.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड

राजस्थानच्या विजयाची 2 मोठी कारणे

बटलर, जायस्वाल व सॅमसनची अर्धशतकेः आधी फलंदाजीला उतरलेल्या राजस्थानची टॉप ऑर्डर यशस्वी राहिली. त्यांच्या टॉप-3 फलंदाजांनी अर्धशतके केली. आधी बटलरने 20 चेंडूंत, नंतर यशस्वी जायस्वालने तर नंतर कर्णधार संजू सॅमसनने 28 चेंडूंत अर्धशतक ठोकले.

चहलची शानदार गोलंदाजीः न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन विकेट घेत हैदराबादला झटका दिला. नंतर चहलने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट घेतल्या. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर हैदराबादचे फलंदाज चाचपडतानाच दिसले.

राजस्थानच्या टॉप-3 फलंदाजांची अर्धशतके

सलामीवीर जोस बटलर, यशस्वी जायस्वाल व कर्णधार संजू सॅमसनच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानच्या संघाने 20 षटकांत पाच गडी गमावून 203 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने 55 धावा केल्या. तर यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलरने प्रत्येकी 54 धावा केल्या. रियान पराग 7 धावा, तर देवदत्त पडिक्कल 2 धावांवरच बाद झाला. पाच गड्यांच्या मोबदल्यात राजस्थानने हैदराबादसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

अशा पडल्या राजस्थानच्या विकेट

 • पहिली: सहाव्या षटकातील 5व्या चेंडूवर फारुखीने जोस बटलरला बोल्ड केले
 • दुसरी : 13 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फारुखीने यशस्वी जायस्वालला मयांक अग्रवालच्या हाती झेलबाद केले.
 • तिसरी : 15 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर उमरान मलिकने देवदत्त पडिक्कलला बोल्ड केले.
 • चौथी : रियान पराजला टी नटराजनने फारुखीच्या हाताने झेलबाद केले.
 • पांचवी : टी नटराजनने संजू सॅमसनला अभिषेक शर्माच्या हाताने झेलबाद केले.

बटलर-जायस्वालने मिळवून दिली स्फोटक सुरूवात

इंग्लिश फलंदाज जोस बटलर आणि यशस्वी जायस्वालने राजस्थान संघाला स्फोटक सुरूवात मिळवून दिली. दोघांनी 35 चेंडूंतच 85 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली. फजल हक फारुखीने ही पार्टनरशिप तोडली. त्याने बटलरला बोल्ड केले.

बटलरचे 16 वे अर्धशतक

ओपनिंगला आलेल्या जोस बटलरने आयपीएल कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक झळकावले. त्याने 20 चेंडूंतच फिफ्टी पूर्ण केली. तो 22 चेंडूंत 54 धावा काढून बाद झाला. त्याने 245.45 च्या स्ट्राइक रेटने रन केले. बटलरच्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत हैदराबाद संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

आरआरचे नेतृत्व संजू सॅमसनने, तर भुवनेश्वर कुमारने एडन मार्करामच्या अनुपस्थितीत हैदराबादचे नेतृत्व केले.

हैदराबाद शेवटचा हंगाम विसरून पुढे जाण्यास उत्सुक
सनरायझर्स हैदराबादची गेल्या मोसमातील कामगिरी काही विशेष नव्हती. गेल्या मोसमात संघ केवळ लीग टप्पा गाठू शकला. 14 पैकी आठ सामन्यांत त्यांचा पराभव झाला. यामुळे त्याला आठव्या क्रमांकावर राहून स्पर्धा संपवावी लागली. संघ 10 पैकी 6 हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचला आणि 2 वेळा अंतिम फेरीतही खेळला.

राजस्थानविरुद्ध हा संघ हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अकिल हुसेन आणि आदिल रशीद यांना आपले 4 विदेशी खेळाडू बनवू शकतो. त्याचबरोबर मयंक अग्रवाल, भुवनेश्वर कुमार आणि राहुल त्रिपाठी हे भारतीय खेळाडूही संघाला मजबूत करत आहेत. संघाला पहिल्या सामन्यासाठी एडम मार्कराम, मार्को जॅनसेन आणि हेनरिक क्लासेनशिवाय खेळावे लागेल. हे तिघेही दक्षिण आफ्रिकेत नेदरलँडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहेत.

राजस्थान गेल्या हंगामाचा उपविजेता संघ
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा उत्साह या मोसमातील पहिल्या सामन्यापासूनच शीर्षस्थानी राहील. हा संघ गेल्या मोसमात उपविजेता ठरला होता. अंतिम फेरीत गुजरातकडून पराभूत झाला होता. संघाने 14 पैकी 9 सामने जिंकून टॉप-4 मध्ये स्थान मिळवले होते. प्रसिद्ध कृष्णाच्या बॅकमध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यामुळे राजस्थानचा वेगवान गोलंदाज यंदाच्या मोसमातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संदीप शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हैदराबाद विरुद्ध, संघ जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेंट बोल्ट यांना त्यांचे 4 परदेशी खेळाडू बनवू शकतो. त्याचबरोबर संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, नवदीप सैनी आणि युझवेंद्र चहल हे भारतीय खेळाडूही संघाला मजबूत करत आहेत.

दोन्ही संघांची संमिश्र कामगिरी
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी लीगमध्ये प्रत्येकी एक विजेतेपद पटकावले आहे. लीगच्या पहिल्याच सत्रात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करून आरआर चॅम्पियन बनले. तर SRH ने 2016 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. आयपीएलमध्ये दोन्ही संघ 16 वेळा आमनेसामने आले आणि दोघांनी 8-8 सामने बरोबरीत जिंकले.