आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022 रोमांचकारी सामना:'रसलने पंजाब संघाला तोडले; आग लावली आग'; KKR च्या विजयानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंद्रे रसेलच्या धमाकेदार खेळीने KKR संघाने IPL 2022 मध्ये चांगलीच रंगात वाढविली आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 8व्या सामन्यात कोलकता नाइट रायडर्सने पंजाब किंग्स वर एकहाती विजय मिळवला. केकेआर संघाने मिळवलेल्या यशात रसेलचा मोठा वाटा आहे. त्यामुळे संघाच्या चाहत्यांच्या तोंडावर देखील सध्या रसेल याचेच नाव आहे. 'रसलने पंजाब संघाला तोडले, आग लावली आग' अशा शब्दांत प्रेक्षकांनी रसेलला डोक्यावर घेतले.

पश्चिम बंगाल मधून आलेले निर्मल घोष यांनी केकेआर संघाच्या विजयात आंद्रे रसेल याचा मोठा वाटा असल्याचे म्हटले आहे. मलाड येथून आलेले शेख यांनी देखील रसेल याच्या खेळीमुळे KKR संघ विजयाचा दावेदार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे म्हटले आहे. IPL 2022 च्या कप वर केकेआर संघाचे नाव कोरले जाणार असल्याचा दावा संघाचे चाहते करत आहे.

केकेआर संघाचा छोटा चाहता, पंजाब विरुद्धच्या लढतीत संघाने जोरदार फलंदाजी केली. त्यामुळे सामना रोमांचकारी ठरला
केकेआर संघाचा छोटा चाहता, पंजाब विरुद्धच्या लढतीत संघाने जोरदार फलंदाजी केली. त्यामुळे सामना रोमांचकारी ठरला

सुरुवात अडखळती मात्र सामना रोमांचकारी

कोलकता विरुद्ध पंजाब दोन्ही संघात झालेली लढत रोमांचकारी झाली. कोलकता कडून तुफान फटकेबाजी करत रसेलने संघाला एकहाती विजय मिळवून दिला. रमेश यादवने घेतलेल्या चार विकेटच्या जोरावर पंजाबला 137 धावांवर रोखण्यात केकेआरला यश आले होते. मात्र सुरुवातीलाच केकेआरचे दिग्गज खेळाडू बाद झाल्याने 4 बाद 51 धावा अशी अवस्था झाली होती. मात्र आंद्रे रसलने तू फलंदाजीच्या जोरावर अर्धशत झळकवत केकेआरला सहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

बातम्या आणखी आहेत...