आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीगमधील 'कोलकाता नाइट रायडर्स' विरुद्ध 'गुजरात टायटन्स' सामना तमाम क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील. या सामन्यात 'कोलकाता नाइट रायडर्स'च्या (KKR) रिंकू सिंहने सलग 5 षटकार ठोकत गुजरात टायटन्सचा 3 विकेट्स राखून पराभव केला. रिंकू सिंहची दमदार खेळी पाहून केवळ चाहतेच वेडे झाले नाहीत, तर 'कोलकाता नाइट रायडर्स' (केकेआर) चा मालक शाहरुख खानही रिंकूचा मोठा चाहता झाला आहे. शाहरुख खानने तर त्याच्या 'पठाण' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या पोस्टरवर रिंकूलाही स्थान दिले आहे.
'पठाण'च्या पोस्टरवर झळकला रिंकू सिंह
शाहरुख खानने रिंकूवर प्रेमाचा वर्षाव करणारे ट्विट केले आहे, ज्याच्यासोबत त्याने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण'चे पोस्टरदेखील शेअर केले आहे. पोस्टरची खास गोष्ट म्हणजे यात शाहरुख खानच्या चेहऱ्याऐवजी रिंकू सिंगचा चेहरा लावण्यात आला आहे, जे पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. शाहरुख खानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'झूमे जो रिंकू!!! मेरे बच्चे रिंकू, नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यू आर ब्यूटीज!!! केकेआर आणि वेंकी मैसूर तुमच्या हृदयाची काळजी घ्या सर!
KKR Vs GTचा ऐतिहासिक सामना
रविवारी 'कोलकाता नाइट रायडर्स' आणि 'गुजरात टायटन्स' यांच्यातील शानदार सामन्यात केकेआरच्या रिंकू सिंहने सलग पाच षटकार ठोकून गुजरात टायटन्सचा तीन विकेट्स राखून पराभव केला. रिंकूचा हा ऐतिहासिक पराक्रम पाहून बॉलीवूड स्टार्सही त्याचे चाहते झाले आहेत. शाहरुख खानची मुले आर्यन आणि सुहाना खानसोबतच अभिनेता रणवीर सिंगही रिंकूनेही त्याचे कौतुक केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी रिंकू सिंहवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या सामन्यात रिंकू सिंह व्यतिरिक्त नितीश राणाने 29 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकत 45 धावा केल्या.
संबंधित वृत्त...
सिक्सर किंग रिंकूच्या संघर्षाची कहाणी : सिलिंडर उचलायचा, झाडू मारायचीही वेळ आली; वाचा रिंकू सिंहचा खडतर प्रवास
रिंकूला कोलकाताने 80 लाख रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला फक्त 20 लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. तेही त्याच्यासाठी पुरेसे होते, कारण त्याचे कुटुंब गरीब होते. रिंकू आज आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय स्टार आहे, पण एक काळ असा होता जेव्हा रिंकू सिलिंडर पोहोचवायचे काम करत होता. गरीबी एवढी होती की, झाडू मारण्याची वेळ आली होती. वाचा रिंकू सिंहची कहाणी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.