आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुफानी खेळी:शिखर धवनने मोडला विराट कोहलीचा IPL मधील विक्रम, सर्वात कमी डावात अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने 86 धावांची धडाकेबाज खेळी केली. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील 50 वे अर्धशतक आहे. हे अर्धशतक ठोकत धवनने कोहलीची बरोबरी केली तर दुसरीकडे विराट कोहलीचा विक्रम देखील मोडला आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी डावात 50 वेळा 50+ धावा करणारा धवन हा दुसरा फलंदाज ठरला आहे. धवनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 207 डावांमध्ये हा पराक्रम केलेला आहे. सर्वात कमी डावात 50+ आणि 50 वेळा धावा करणारा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. ज्याच्या नावावर केवळ 132 डावात अशी कामगिरी करण्याचा विक्रम आहे. त्याचवेळी कोहलीने 216 डाव खेळून हा विक्रम केला.

शिखर धवन IPL मधील सर्वात कमी डावात 50+ धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला

  • 148 : डेव्हिड वॉर्नर
  • 207 : शिखर धवन*
  • 216 : विराट कोहली

IPL च्या इतिहासात 50 अर्धशतक करणारा धवन तिसरा फलंदाज
याशिवाय आयपीएलच्या इतिहासात 50 अर्धशतकं झळकावणारा धवन हा तिसरा फलंदाज आहे. याआधी विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांनी असा पराक्रम केला आहे. कोहलीने आयपीएलमध्ये 50 अर्धशतके झळकावली आहेत, तर वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये 60 अर्धशतके झळकावली आहेत.

पंजाब किंग्जने राजस्थानचा केला पाच धावांनी पराभव

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सलामीवीर कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर, नॅथन एलिसच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने बुधवारी येथे राजस्थान रॉयल्सचा पाच धावांनी पराभव करत इंडियन प्रीमियर लीगमध्ये दुसरा विजय नोंदवला.

पंजाबने धवन (56 चेंडूत 86, नऊ चौकार, तीन षटकार) आणि प्रभसिमरन (34 चेंडूत 60, सात चौकार, तीन षटकार) यांच्यात पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी करून चार बाद 197 धावा केल्या. धवनने जितेश शर्मा (27) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 66 धावा जोडल्या.

प्रत्युत्तरात असा रंगला सामना
प्रत्युत्तरात एलिस (30 धावांत चार गडी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थान रॉयल्स संघाने शिमरॉन हेटमायर (17 चेंडूंत 36 धावा, तीन षटकार, एक चौकार) आणि ध्रुव जुरेल (15 चेंडूंत नाबाद 32 धावा, दोन षटकार- तीन चौकार) सातव्या विकेटसाठी 26 चेंडूत 61 धावांची भागीदारी करूनही सात विकेट्सवर 192 धावाच करता आल्या. रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने (42) सर्वाधिक धावा केल्या.