आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब किंग्जचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या शिखर धवनने तो प्रेमात पडला असल्याची कबुली दिली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता चाहते त्याला विचारत आहेत की तू लग्न कधी करणार?
या व्हिडिओमध्ये गब्बर कबूल करत आहे की, त्याच्या आयुष्यात प्रेमाने प्रवेश केला असून आता तो एका कमिटेड नात्यात आहे. इतकंच नाही तर तो या नात्यामुळे खूप खूश असल्याचंही सांगतोय. जुन्या गोष्टी विसरून पुन्हा पुढे जायचे असल्याचेही तो म्हणत आहे.
यावरून अंदाज लावण्यात येत आहेत की, गब्बर एका मुलीसोबतच्या नात्याबद्दल बोलत आहे. व्हिडीओ मेकरला शिखर विचारताना दिसत आहे की, तू व्हिडिओ बनवत आहेस का? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिखर धवनचे कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
शिखरची पहिली पत्नी आयशाने 2020 मध्ये वेगळे होण्याची केली होती घोषणा
खरं तर, शिखरची पहिली पत्नी आयशाने 2020 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली होती आणि दोघांमधील घटस्फोटाचा खटला अजूनही सुरू आहे. अलीकडेच एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शिखरने आयशा मुखर्जीकडून घटस्फोटावर विचारलेल्या प्रश्नावर म्हटले होते की, लग्न मोडण्यात चूक झाली होती. घटस्फोटाचा मुद्दा अजूनही न्यायालयात आहे. लग्न यशस्वी झाले नाही, यामध्ये फेल झालो.
त्या क्षेत्राची कल्पना नसल्यामुळे तो अपयशी ठरल्याचेही त्याने सांगितले. आता त्याने पुन्हा लग्न केले तर त्याच्याकडे जास्त अनुभव असेल.
पंजाब किंग्जने दोन सामने जिंकले
पंजाब किंग्जने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, 2 सामने जिंकून गुणतालिकेत ते सध्या सहाव्या स्थानावर आहेत. पंजाबशिवाय राजस्थान, चेन्नई, लखनऊ आणि कोलकाता यांनीही प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. त्याचेही प्रत्येकी दोन गुण आहेत. रनरेटमुळे हे संघ पॉइंट टेबलमध्ये पंजाबपेक्षा पुढे आहेत.
शिखर धवन टॉपवर
शिखर धवन सध्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात धावा करण्यात अव्वल स्थानावर आहे. तीन सामन्यांत 225 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. तो दोनदा नाबाद राहिला आहे. त्याचबरोबर 2 अर्धशतकेही केली आहेत. ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने 3 सामन्यात 94.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे. त्याने 87.50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.