आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL चाहत्यांवर धोनीच्या प्रेमाचा फिव्हर:कोणी बोर्डाची परीक्षा तरी मैदानावर तर काही लुंगी घालून हजर, पाहा सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावरील स्थिती

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचे चाहते काय करतील याचा काही भरवसा नसतो. आयपीएल हंगामातील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी देखील स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी दिसून आली. त्यातील काहींच्या हातात धोनीच्या नावाच्या पाट्या दिसून आल्या. तर काही टॅटू काढून मैदानावर हजर आहेत.

बोर्डाची परीक्षा तरी मैदानावर

सध्या परीक्षेचा हंगाम चालू आहे. अशातच आयपीएलचे सामने देखील सुरू आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आणि त्याच वेळी आयपीएलचे आयोजन असा आरोपही अनेकदा करण्यात आला आहे. अशाच एका विद्यार्थ्याने परीक्षा असतांनाही मी धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी मैदानावर आलो असल्याचे बॅनर तयार केले होते.

चेन्नईचे चाहते लुंगी घालून हजर

चेन्नई आणि धोनीचे कनेक्शन यामुळे चेन्नई वरून अनेक चाहते धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी मैदानावर येतात. यासाठी लुंगी घालून हे चाहते मैदानावर हजर होते. सामना सुरू होण्यापूर्वीच चेन्नई संघाच्या चाहत्यांना विजयाचा विश्वास आहे.

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 11वा सामना थोड्याच वेळात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. धोनीच्या फॅन्सची संख्या जास्त असली तरी चेन्नईच्या संघाने आतापर्यंत आयपीएलच्या चालू हंगामात काहीही कमाल दाखवलेली नाही. त्यामुळे त्यांना सलग तिसरा पराभव पत्करावा लागू शकतो. पंजाबचा संघाने एक सामन्यात विजय मिळवला असला तरी सध्या दोन्ही संघाचे खेळाडू फॉर्ममध्ये नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही संघासमोर विजयाचे लक्ष्य आहे.

बातम्या आणखी आहेत...