आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद vs लखनऊ:लखनऊचा सलग दुसरा विजय, आवेश खान बनला गेमचेंजर, हैद्राबादचा संघ दुसऱ्यांदा पराभूत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 12 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) सनरायझर्स हैद्राबादवर 12 धावांनी विजय मिळवला. त्यांचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे.

स्कोअर पाहण्यासाठी ईथे क्लिक करा

प्रथम फलंदाजी करताना लखनऊने सनरायझर्स हैदराबादला (SRH) 170 धावांचे लक्ष्य दिले होते. हैद्राबादचा संघ केवळ 157 धावाच करू शकला. लखनऊकडून आवेश खानने 4 आणि जेसन होल्डरने 3 बळी घेतले.

SRH ला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती, पण त्यांचे फलंदाज फक्त 3 धावा करू शकले. हैद्राबादकडून राहुल त्रिपाठीने 44 धावा केल्या. त्यापाठोपाठ निकोलस पूरण (34) हाच मैदानावर टिकाव धरू शकला. हैदराबादने आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लखनऊकडून कर्णधार केएल राहुलने 68 आणि दीपक हुडाने 51 धावा केल्या.

हायलाईट्स

होल्डरने 6 चेंडूत 3 बळी घेतले

SRH ला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती, पण लखनऊच्या जर्सीमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरने 6 चेंडूत 3 गडी बाद करून लखनऊचा विजय निश्चित केला. जेसनने वॉशिंग्टन सुंदर (18), भुवनेश्वर कुमार (1) आणि रोमारियो शेफर्ड (1) यांना बाद केले.

आवेशचा कहर

आवेश खानने सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. युवा वेगवान गोलंदाजाने केन विल्यमसन (16), अभिषेक शर्मा (13), निकोलस पूरन (34) आणि अब्दिल समद (0) यांना त्याने बाद केले. 18व्या षटकात पूरन आणि समदला लागोपाठ दोन चेंडूंवर बाद करून तो गेमचेंजर बनला.

पूरन 34 धावा करून बाद झाला.

निकोलस पूरनने 24 चेंडूत सुरेख फटकेबाजी करीत 34 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. 18व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर आवेशने त्याची विकेट घेतली आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. बाद होण्यापूर्वी त्याने सुंदरसोबत पाचव्या विकेटसाठी 25 चेंडूत 45 धावा जोडल्या.

कर्णधार केनची बॅट तळपली नाही

SRH चा कर्णधार केन विल्यमसन 16 चेंडूत 16 धावा काढून बाद झाला. त्याची विकेट आवेश खानने घेतली. गेल्या सामन्यातही केनला केवळ 2 धावाच करता आल्या होत्या.

लखनऊचा कर्णधार केएल राहुलने कठीण परिस्थितीत अप्रतिम खेळी खेळताना 40 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आयपीएलमधील हे 28 वे आणि या फॉरमॅटमधील एकंदर 50 वे अर्धशतक आहे. तो 50 चेंडूत 68 धावांवर नटराजनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. क्रिकेटमध्ये 50 अर्धशतके झळकावणारा राहुल भारताचा सहावा खेळाडू ठरला. त्याच्या आधी विराट कोहली (75), रोहित शर्मा (69), शिखर धवन (63), गौतम गंभीर (53) आणि सुरेश रैना (51) यांनी अर्धशतक ठोकले आहे.

दीपक हुडाने सुरेख खेळी करत आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक आणि या हंगामातील दुसरे अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले. आयपीएलच्या एका हंगामात त्याने दोन पन्नास धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो शेफर्डने 33 चेंडूत 51 धावा करून बाद झाला

लखनऊने पहिल्या 3 विकेट केवळ 27 धावांत गमावल्या. यानंतर चौथ्या विकेटसाठी कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी 61 चेंडूत 87 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात पुनरागमन केले. हुडाला बाद करून शेफर्डने ही जोडी फोडली.​

उमरान मलिकने 10व्या ओवरमध्ये 20 धावा दिल्या. त्याने पहिला चेंडू 148 किमी प्रतितास वेगाने टाकला, ज्यावर हुडाने डीप कव्हरवर चौकार मारला. यानंतर केएल राहुलने ओव्हरच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन अप्रतिम चौकार मारले. तिसरा चेंडू 151 च्या वेगाने आला आणि केएलने उशीराने तो कट केला आणि थर्ड मॅनवर चौकार मारला. चौथ्या चेंडूचा वेग 145 होता, त्यावर राहुलने एक्स्ट्रा कव्हरवर चौकार मारला.​​​​​​ वॉशिंग्टन सुंदरचा हा 100 वा टी-20 सामना असून त्याने अप्रतिम गोलंदाजी करताना 4 ओवरमध्ये 28 धावा देऊन 2 बळी घेतले. आपल्या स्पेलच्या पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर त्याने क्विंटन डी कॉकला बाद केले. त्याचा झेल केन विल्यमसनने कॅच कव्हरवर टिपला. यानंतर पुढच्याच ओवरमध्ये सुंदरने लुईसला LBW बाद केले.

मनीष पांडेने 10 चेंडूत 11 धावा केल्या आणि त्याला रोमॅरियो शेफर्डने बाद केले. मनीष शेफर्डच्या चेंडूला पंच करायला गेला, पण चेंडू थेट मिडऑनला गेला आणि भुवनेश्वर कुमारने अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर त्याने 16व्या ओवरमध्ये 50 धावा केल्यानंतर आक्रमक दिसत असलेल्या दीपक हुडाची विकेट घेतली.

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

SRH: केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्कराम, अब्दुल समद, रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

एलएसजी: केएल राहुल (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान

सीजनमध्ये त्यांच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने शानदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईसमोर 211 धावांचे लक्ष्य गाठले होते. आयपीएलच्या इतिहासातील हा चौथा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. लखनऊसाठी डी कॉकने 61, केएल राहुलने 40 आणि एविन लुईसने 55 धावा केल्या. त्याने तीन चेंडूत सहा गडी राखून सामना जिंकला होता.

बातम्या आणखी आहेत...