आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊचा हैदराबादवर 7 गड्यांनी विजय:प्रेरक मंकडची मॅचविनर फिफ्टी, निकोलस पूरनने खेचला विजयी चौकार

हैदराबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील 58 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) सनरायझर्स हैदराबादवर (SRH) 7 गड्यांनी विजय मिळवला. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात हैदराबादने विजयासाठी दिलेले 183 धावांचे आव्हान लखनऊने 3 गडी गमावून 19.2 षटकांतच पूर्ण केले.

मंकडची मॅचविनर फिफ्टी

लखनऊकडून प्रेरक मंकडने सर्वाधिक 64 धावांची नाबाद मॅचवनिर खेळी केली. त्यानंतर निकोलस पूरनने नाबाद 44, मार्कस स्टॉयनिसने 40, क्विंटन डी कॉकने 29 धावा केल्या. हैदराबादकडून ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडेय आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून हैदराबादने फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा करत लखनऊला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते.

लखनऊचा डाव

या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची सुरूवात संथ झाली. चौथ्या षटकात काईल मेयर्सला 2 धावांवर बाद करत फिलिप्सने लखनऊला पहिला झटका दिला. त्यानंतर डी कॉक आणि मंकडने डाव सावरत दुसऱ्या गड्यासाठी 42 धावांची भागीदारी केली. डी कॉकला नवव्या षटकात 29 धावांवर बाद करत मार्कंडेयनी ही जोडी फोडली. त्यानंतर मंकडने स्टॉयनिससोबत डाव पुढे नेत तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने स्टॉयनिसला 40 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान मंकडने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. प्रेरक मंकड आणि निकोलस पूरनने शेवटपर्यंत नाबाद राहत 19.2 षटकांत संघाला विजयी धावसंख्या गाठून दिली.

हैदराबाद-लखनऊ सामन्याचे स्कोअरकार्ड

अशा पडल्या लखनऊच्या विकेट

  • पहिलीः चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने काईल मेयर्सला एडन मार्करमच्या हाती झेलबाद केले.
  • दुसरीः नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मार्कंडेयने डी कॉकला अभिषेक शर्माच्या हाती झेलबाद केले.
  • तिसरीः सोळाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माने मार्कस स्टॉयनिसला अब्दुल समदच्या हाती झेलबाद केले.

क्लासेनची फिफ्टी हुकली

हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्यानंतर अब्दुल समदने 37, अनमोलप्रीत सिंगने 36, एडन मार्करमने 28, राहुल त्रिपाठीने 20 धावा केल्या. लखनऊकडून कृणाल पंड्याने 2, तर युधवीर सिंग, आवेश खान, यश ठाकूर आणि अमित मिश्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हैदराबादचा डाव

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर अभिषेक शर्मा तिसऱ्या षटकात 7 धावांवर बाद झाला. युधवीर सिंगने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सहाव्या षटकात यश ठाकूरने राहुल त्रिपाठीला 20 धावांवर बाद केले. तर नवव्या षटकात अमित मिश्राने अनमोलप्रित सिंगला 36 धावांवर बाद केले. यानंतर तेराव्या षटकात कृणाल पंड्याने एडन मार्करमला 28 धावांवर तर ग्लेन फिलिप्सला शून्यावर बाद केले. यानंतर क्लासेन आणि समदने डाव पुढे नेत सहाव्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. एकोणिसाव्या षटकात आवेश खानने क्लासेनला 47 धावांवर बाद केले. नंतर अब्दुल समद आणि भुवनेश्वर कुमारने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 182 वर नेली.

अशा पडल्या हैदराबादच्या विकेट....

  • पहिली : तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर युधवीर सिंगने अभिषेक शर्माला डी कॉकच्या हाती झेलबाद केले.
  • दुसरीः सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यश ठाकूरने राहुल त्रिपाठीला डी कॉकच्या हाती झेलबाद केले.
  • तिसरीः नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अमित मिश्राने अनमोलप्रित सिंगला स्वतःच झेलबाद केले.
  • चौथीः तेराव्या षटकात कृणाल पंड्याने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर डी कॉकने एडन मार्करमला स्टंप केले.
  • पाचवीः तेराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कृणाल पंड्याने ग्लेन फिलिप्सला बोल्ड केले.
  • सहावीः एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आवेश खानने हेन्रिक क्लासेनला प्रेरक मंकडच्या हाती झेलबाद केले.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11...

सनरायझर्स हैदराबाद : ऐडन मार्करम (कर्णधार), अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, फजल हक फारूकी आणि टी नटराजन.

इम्पॅक्ट प्लेयर्स : विव्रांत शर्मा, सनवीर सिंह, मयंक डागर, नीतीश रेड्डी, मार्को यान्सेन.

लखनऊ सुपर जायंट्स : कृणाल पंड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक, काईल मेयर्स, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवि बिश्नोई, युद्धवीर सिंह आणि आवेश खान.

इम्पॅक्ट प्लेयर्स : स्वप्निल, डॅनिएल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक हुडा, गुलेरिया.

फोटोंमध्ये पाहा हैदराबाद-लखनऊ सामन्याचा थरार...

हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, सनवीर सिंगला डेब्यू कॅप
सनरायझर्समध्ये फलंदाजी अष्टपैलू सनवीर सिंगला संधी मिळाली आहे, तर लखनऊमध्ये मोहसीन खान आणि दीपक हुडाच्या जागी युधवीर सिंग आणि प्रेरक मंकड यांना खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

लखनऊ आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 2 सामने झाले आहेत. या दोन्ही वेळा लखनऊ जिंकला आहे. या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा लखनऊने ५ विकेट्सने विजय मिळवला.

हैदराबाद गुणतालिकेत नवव्या स्थानावर
हैदराबादने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. संघ 8 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स आणि मार्को जॅनसेन हे लखनऊविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय राहुल त्रिपाठी, मयंक मार्कंडे आणि भुवनेश्वर कुमार या मोठ्या खेळाडूंचा संघात समावेश आहे.

लखनऊ संघाने 11 पैकी 5 सामने जिंकले
या मोसमात लखनऊने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 5 जिंकले आणि तेवढेच सामने गमावले. पावसामुळे एका सामन्याचा निकाल लागला नाही. हैदराबादविरुद्ध संघाचे चार विदेशी खेळाडू क्विंटन डिकॉक, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन असू शकतात. याशिवाय रवी बिश्नोई, कृणाल पंड्या आणि आवेश खान हे खेळाडू संघाला मजबूत करत आहेत.

हैदराबादवर लखनऊ भारी
लखनऊचा हा दुसरा सीझन आहे. हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर लखनऊ आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण दोन सामने झाले आहेत, ज्यामध्ये लखनऊने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.