आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL 15 चा 12 वा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई येथे खेळला जाईल. आयपीएलमध्ये पराभवासह पदार्पण केल्यानंतर, लखनऊने चेन्नई सुपर किंग्जच्या 211 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करून त्यांच्या दुसऱ्या सामन्यात 'अब अपनी बारी है' ची टॅगलाइन योग्य असल्याचे सिद्ध केले.
आता आणखी एका मोठ्या विजयाकडे त्यांची नजर आहे. दुसरीकडे राजस्थानकडून 61 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर हैदराबादचा संघ मैदानात उतरणार आहे.
लिलावात गृहपाठ न केल्याचा फटका सनरायझर्सला बसला आहे
जॉनी बेयरस्टो, डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांसारख्या खेळाडूंना कायम न ठेवल्यानंतर, SRH ला नवीन संघ तयार करून नव्या जोमाने मैदानात उतरायचे आहे, असे वाटले होते. परंतु लिलावादरम्यान हैदराबाद व्यवस्थापनाची खेळाडूंना खरेदी करण्याची कोणतीही रणनीती दिसली नाही. 'जे येत आहेत, सगळे चांगले' या धर्तीवर संघाची निवड करण्यात आली. वॉर्नर आणि बेयरस्टो या स्फोटक सलामीच्या जोडीच्या जागी या संघात सध्या कोणतीही विश्वसनीय सलामी जोडी नाही. मधल्या फळीतही कोणताही भारतीय खेळाडू फारशी कामगिरी करु शकलेला नाही.
टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरच्या जोरावर लखनऊचा विजय
सीझनमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने शानदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईसमोर 211 धावांचे लक्ष्य गाठले. आयपीएलच्या इतिहासातील हा चौथा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. लखनऊसाठी डी कॉकने 61, केएल राहुलने 40 आणि एविन लुईसने 55 धावा केल्या. त्याने तीन चेंडूत सहा गडी राखून सामना जिंकला.
डी कॉकने कर्णधार लोकेश राहुल (40) सोबत पहिल्या विकेटसाठी 99 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर लुईसने आयुष बदोनी सह पाचव्या विकेटसाठी अवघ्या 2.1 षटकात 40 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला लक्ष्यापर्यंत नेले.
भुवनेश्वरच्या नो बॉलने बदलली खेळी, स्पिनही बेदम
सीझनमधील पहिल्या सामन्यात SRH ने RR विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाच्या गोलंदाजांनाही सुरुवातीला स्विंग मिळत होते. 7 चेंडू खेळूनही जोस बटलरला आपले खातेही उघडता आले नाही. भुवनेश्वरच्या पहिल्या षटकात फक्त एक धाव आली. या षटकात त्याने बटलरलाही बाद केले, पण चेंडू नो बॉल ठरला.
चांगली गोलंदाजी असुनही सनरायझर्सच्या गोलंदाजांना सुरुवातीला विकेट्स काढता आल्या नाहीत. भुवनेश्वरचा तो चेंडू नो बॉल नसता आणि सनरायझर्सला विकेट मिळाली असती, तर राजस्थान दडपणाखाली येऊ शकला असता. वॉशिंग्टन सुंदर हा सनरायझर्सचा सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज होता, पण गोलंदाजीत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने तीन षटकात 47 धावा दिल्या आणि त्याला विकेटही घेता आली नाही. हैदराबादला आजच्या सामन्यात अशा गोलंदाजीपासून दूर राहावे लागणार आहे.
मार्करमला खाली पाठवणे महागात पडले, वादग्रस्त झेलनं सामना हिरावला
सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसनने आरआरविरुद्ध पाचव्या क्रमवारीत एडन मार्करमला खेळावले. हैदराबादसाठी मार्करामने नाबाद राहताना सर्वाधिक 57 धावा केल्या. मार्करमला टॉप ऑर्डरवर पाठवणे अधिक फायदेशीर ठरू शकले असते. T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने खूप धावा केल्या होत्या.
हैदराबादच्या डावातील दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर केन विल्यमसन स्लिपमध्ये झेलबाद झाला. चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठाने विकेटकीपर संजू सॅमसनपर्यंत पोहोचला. संजूच्या ग्लोव्हजला सागत चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलच्या हातात आला. देवदत्तने झेल घेण्याआधी चेंडूचा काही भाग जमिनीवर आदळताना दिसत असला तरी पंचांनी विल्यमसनला बाद घोषित केले.
या झेलवर विल्यमसनला आऊट केले नसते तर सामना बऱ्यापैकी बदलू शकला असता. सनरायझर्सने आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे अधिकृत तक्रारही केली आहे. याची भरपाई त्याला आज आपल्या फलंदाजीने करायला आवडेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.