आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादचा पंजाबवर 8 गड्यांनी विजय:त्रिपाठी-मार्करमची विजयी भागीदारी, मार्कंडेयच्या 4 विकेट, धवनच्या झुंजार 99 धावा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील रविवारच्या दुसऱ्या डबल हेडर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सवर 8 गड्यांनी विजय मिळवला. पंजाबने दिलेले 144 धावांचे आव्हान हैदराबादने 2 गडी गमावून 17.1 षटकांतच पूर्ण केले. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने नाबाद 74 तर अॅडम मार्करमने नाबाद 37 धावा केल्या. पंजाबकडून केवळ राहुल चहर व अर्शदीप सिंगला एक-एक विकेट घेता आली.

हैदराबादचा डाव

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबने 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावा केल्या. हैदराबादसमोर विजयासाठी आता 144 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा सामना करताना हैदराबादला चौथ्या षटकातच पहिला धक्का बसला. त्यांचा ओपनर हॅरी ब्रूक 27 धावांवर असताना अर्शदीप सिंगच्या चेंडूवर बोल्ड झाला. तर नंतर नवव्या षटकात त्यांचा दुसरा फलंदाज मंयक अग्रवाल 21 धावांवर असताना राहुल चहरच्या गोलंदाजीवर सॅम करनच्या हाती झेलबाद झाला. मात्र नंतर राहुल त्रिपाठी आणि मार्करमने संघाचा डाव सावरत विजयी भागीदारी केली. दोघेही शेवटपर्यंत नाबाद राहिले. राहुलने 48 चेंडूंत नाबाद 74 तर मार्करमने 21 चेंडूंत नाबाद 37 धावा केल्या.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड

अशा पडल्या हैदराबादच्या विकेट

  • पहिलीः चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीपने हॅरी ब्रूकला बोल्ड केले.
  • दुसरीः नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर राहूल चहरने मयंक अग्रवालला सॅम करनच्या हाती झेलबाद केले.

पॉवर प्लेमध्ये हैदराबादची धीमी सुरूवात

144 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांनी धीमी सुरूवात केली. सुरूवातीच्या 6 षटकांत त्यांनी 1 विकेट गमावून 34 धावा केल्या. त्यांचा ओपनर हॅरी ब्रूक अर्शदीपच्या चेंडूवर बोल्ड झाला.

धवनची 99 धावांची झुंजार खेळी

हैदराबादच्या गोलंदाजीसमोर पंजाबची फलंदाजी ढेपाळली असताना कर्णधार शिखर धवनने एका बाजूने किल्ला लढवताना 99 धावांची नाबाद खेळी केली. हे त्याचे 49 वे अर्धशतक आहे. 99 धावांवर नाबाद राहणारा तो चौथा खेळाडू आहे. याआधी 2013 मध्ये हैदराबादविरोधात सुरेश रैना, 2019 मध्ये बंगळुरूविरोधात ख्रिस गेल, 2021 मध्ये दिल्ली विरोधात मयंक अग्रवाल 99 धावांवर नाबाद राहिले आहेत. तर 2013 मध्ये दिल्लीविरोधात विराट कोहली, 2019 मध्ये कोलकाताविरोधात पृथ्वी शॉ, आणि 2020 मध्ये बंगळुरूविरोधात ईशान किशन, 2020 मध्ये राजस्थान विरोधात ख्रिस गेल, 2022 मध्ये हैदराबादविरोधात ऋतुराज गायकवाड 99 धावांवर बाद झाले आहेत.

पॉवर प्लेमध्ये पंजाबची खराब सुरूवात

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीला आलेल्या हैदराबादला भूवनेश्वर कुमार आणि मार्को यान्सेनने चांगली सुरूवात मिळवून दिली. दोघांनी स्पेलच्या पहिल्या षटकांत विकेट घेतल्या. मॅथ्यू शॉर्ट एक तर प्रभसिमरन शून्यावर बाद झाला. पॉवर प्लेमध्ये पंजाबने 3 गडी गमावून 41 धावा केल्या.

पंजाबचा डाव

यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. त्यांचा ओपनर प्रभसिमरन भूवनेश्वर कुमारच्या चेंडूवर पायचित झाला. तो शून्यावरच बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात मार्को यान्सेनने मॅथ्यू शॉर्टला पायचित केले. त्यानंतर चौथ्या षटकात जितेश शर्माही यान्सेनच्या चेंडूवर मार्करामच्या हाती झेलबाद झाला. नंतर शिखर धवनने सॅम करनच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र नवव्या षटकात सॅम करन मार्कंडेयच्या चेंडूवर भूवनेश्वर कुमारच्या हाती झेलबाद झाला. तर नंतर दहाव्या षटकात सिकंदर रझाही उम्रान मलिकच्या गोलंदाजीवर मयंक अग्रवालच्या हाती झेलबाद झाला. सॅम करनने 22 तर रझाने 6 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या सलग दोन षटकांत पंजाबचे दोन फलंदाज बाद झाले. शाहरूख खान आणि हरप्रीत ब्रार अनुक्रमे 4 व 1 धाव करून बाद झाले. मार्कंडेयने शाहरूख खानला, तर ब्रारला उमरान मलिकने बाद केले. यानंतर आलेला राहुल चहर आणि नॅथन एलिस दोघांचीही विकेट मयंक मार्कंडेयने घेतली. शिखर धवनने एकट्याने शेवटपर्यंत खिंड लढवत नाबाद 99 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावरच पंजाबने 143 धावांपर्यंत मजल मारली.

अशा पडल्या पंजाबच्या विकेट

  • पहिलीः पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भूवनेश्वर कुमारने प्रभसिमरन सिंगला पायचित केले.
  • दुसरीः दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मार्को यान्सेनने मॅथ्यू शॉर्टला पायचित केले.
  • तिसरीः चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्को यान्सेनने जितेश शर्माला मार्करामच्या हाती झेलबाद केले.
  • चौथीः नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मयंक मार्कंडेयने सॅम करनला भूवनेश्वर कुमारच्या हाती झेलबाद केले.
  • पाचवीः दहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर उमरान मलिकने सिकंदर रझाला मयंक अग्रवालच्या हाती झेलबाद केले.
  • सहावीः अकराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मयंक मार्कंडेयने शाहरूख खानला पायचित केले.
  • सातवीः बाराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उमरान मलिकने हरप्रीत ब्रारला बोल्ड केले.
  • आठवीः 13 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्कंडेयने राहुल चहरला पायचित केले.
  • नववीः पंधराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मयंक मार्कंडेयने नॅथन एलिसला बोल्ड केले.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11...

सनरायझर्स हैदराबाद : एडन मार्कराम (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, हेन्रिक क्लासने, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, उमरान मलिक, थंगरासू नटराजन.

इम्पॅक्ट खेळाडू : अब्दुल समद, अनमोलप्रीत सिंग, अभिषेक शर्मा, मयंक डागर.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शाहरुख खान, नॅथन एलिस, मोहित राठी, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

इम्पॅक्ट खेळाडू : ऋषी धवन, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे.

पंजाबचे दोन्ही सामने रोमहर्षक
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने या स्पर्धेत पहिले 2 सामने जिंकून सर्वांना चकित केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवल्यानंतर, संघाने रोमहर्षक चकमकीत राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव केला. नॅथन एलिस, अर्शदीप सिंग, शिखर धवन, भानुका राजपक्षे आणि प्रभसिमरन सिंह हे आतापर्यंत संघाच्या विजयाचे हिरो ठरले आहेत.

हैदराबादविरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू मॅथ्यू शॉर्ट, कगिसो रबाडा, सॅम करन आणि नॅथन एलिस असू शकतात. याशिवाय कर्णधार शिखर धवन, प्रभसिमरन सिंग आणि राहुल चहरही संघाला ताकद देत आहेत. भानुका राजपक्षे दुखापतीमुळे सामना खेळू शकणार नाही, अशा परिस्थितीत शॉर्टला संधी मिळेल. रबाडा पुनरागमन करत असताना तो सिकंदर रझाची जागा घेऊ शकतो.

हैदराबादची स्पर्धेत खराब सुरुवात
स्टार खेळाडूंनी सजलेल्या सनरायझर्स हैदराबादला स्पर्धेतील 2 सामन्यांत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 72 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाचा लखनऊ सुपरजायंट्सकडून 5 विकेट्सने पराभव झाला. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला संघासाठी विशेष काही करता आलेले नाही.

घरच्या सामन्यात संघाचे 4 परदेशी खेळाडू हॅरी ब्रूक, एडन मार्कराम, आदिल रशीद आणि फजलहक फारुकी असू शकतात. याशिवाय मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद आणि भुवनेश्वर कुमार हेही संघाला मजबूत करत आहेत.

हेड टू हेडमध्ये SRH पुढे
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 20 सामने खेळले गेले आहेत. हैदराबाद संघ 13 वेळा तर पंजाब संघ 7 वेळा विजयी झाला आहे.