आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 52 व्या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सला (RR) 4 गड्यांनी हरवले. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा करताना 20 षटकांत 2 गडी गमावून 214 धावा करत हैदराबादला विजयासाठी 215 धावांचे आव्हान दिले. हैदराबादने 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केले.
शर्माची फिफ्टी, त्रिपाठीची हुकली
हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठीने 47, अनमोलप्रित सिंगने 33, हेन्रिक क्लासेनने 26, ग्लेन फिलिप्सने 25, अब्दुल समदने 17 धावा केल्या. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने 4 विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव आणि अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हैदराबादचा डाव
याचा पाठलाग करताना हैदराबादला ओपनर अनमोलप्रित सिंग आणि अभिषेक शर्माने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात अनमोलप्रित सिंगला 33 धावांवर बाद करत युजवेंद्र चहलने ही जोडी फोडली. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीने डाव पुढे नेत दुसऱ्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी केली. तेराव्या षटकात अभिषेक शर्माला 55 धावांवर बाद करत अश्विनने ही जोडी फोडली. यानंतर सोळाव्या षटकात चहलने हेन्रिक क्लासेनला 26 धावांवर बाद केले. तर चहलनेच अठराव्या षटकात राहुल त्रिपाठीला 47 धावांवर बाद केले. त्याच षटकात चहलने एडन मार्करमलाही 6 धावांवर पायचित केले. यानंतर एकोणिसाव्या षटकात कुलदीप यादवने ग्लेन फिलिप्सला 25 धावांवर बाद केले. अब्दुल समद आणि यान्सेनने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या हैदराबादच्या विकेट
बटलरचे शतक हुकले
राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 95 धावा केल्या. त्याचे शतक केवळ 5 धावांनी हुकले. त्यानंतर संजू सॅमसनने 66, यशस्वी जैस्वालने 35 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मार्को यान्सेनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
राजस्थानचा डाव
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला ओपनर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. पाचव्या षटकात जैस्वालला 35 धावांवर बाद करत यान्सेनने ही जोडी फोडली. त्यानंतर बटलर आणि सॅमसनने तडाखेबंद खेळी करत डाव पुढे नेला. दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण करत दुसऱ्या गड्यासाठी 138 धावांची भागीदारी केली. एकोणिसाव्या षटकात बटलर शतकापासून 5 धावा दूर असताना त्याला बाद करत भुवनेश्वर कुमारने ही जोडी फोडली. त्यानंतर सॅमसन आणि हेटमायरने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 214 वर नेली.
अशा पडल्या राजस्थानच्या विकेट
दोन्ही संघांचे प्लेइंग 11...
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद: एडन मार्करम (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को यान्सेन, विव्रांत शर्मा, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
राजस्थानने 10 पैकी 5 सामने जिंकले
राजस्थानने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि तेवढ्याच सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. सध्या संघ 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. राजस्थानलाही मागील दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
हैदराबादविरुद्ध संघाचे चार विदेशी खेळाडू जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट आणि अॅडम झम्पा असू शकतात. याशिवाय यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि रविचंद्रन अश्विन हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
हैदराबादने 9 पैकी फक्त 3 सामने जिंकले
हैदराबादने या मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 9 सामन्यांत केवळ तीन विजय मिळवले आहेत तर सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. 10 संघांच्या यादीत हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. राजस्थानविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू एडन मार्कराम, हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन आणि मार्को यानसेन असू शकतात.
दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी लीगमध्ये प्रत्येकी एक विजेतेपद पटकावले आहे. राजस्थान रॉयल्स लीगच्या पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनले होते. तर 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा विजेता ठरला. या स्पर्धेत दोन्ही संघ 17 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये राजस्थानने 9 आणि हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.