आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

षटकरांची हॅट्ट्रिक:स्टोइनिसची षटकरांची हॅट्ट्रिक; एका षटकात 5 षटकार, शिवम मवीच्या 19 व्या षटकात स्टोइनिस-जेसन होल्डरने ठोकले 5 षटकार

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकेश राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपरजायंट्स संघाने आयपीएलमध्ये शनिवारी गत उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध ७ गड्यांच्या मोबदल्यात १७६ धावा काढल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडून सलामीवीर क्विंटन डिकाॅकने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. यासह डिकॉकने यंदाच्या सत्रात शानदार अर्धशतक साजरे केले.

यादरम्यान संघाकडून मार्क्स स्टोइनिस आणि जेसन होल्डरची तुफानी फटकेबाजी लक्षवेधी ठरली. या दोघांनी १९ व्या षटकात पाच षटकार खेचले. यात स्टोइनिसने षटकारांची हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने गोलंदाज शिवम मवीच्या षटकांत पहिल्या तीन चेंडूंवर सलग षटकार खेचले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात त्याचा झेल गेला. त्याने १४ चेंडूंत २८ धावा काढल्या.

त्यानंतर जेसन होल्डरने शेवटच्या दोन्ही चेंडूंवर सलग दोन षटकार खेचले. त्याने ४ चेंडूंत १३ धावांची खेळी केली. दरम्यान, टीमचा कर्णधार लोकेश राहुल सपशेल अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला. कोलकाता संघाकडून रसेलने दोन बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...