आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा हैदराबादवर 8 गड्यांनी विजय:ग्रीनचे तडाखेबंद शतक, रोहितचीही फिफ्टी, प्लेऑफ एंट्री एक पायरी दूर

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) सनरायझर्स हैदराबादवर (SRH) 8 गड्यांनी विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात हैदराबादने विजयासाठी दिलेले 201 धावांचे आव्हान मुंबईने 18 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले.

ग्रीनचे तडाखेबंद शतक

मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 100 धावा केल्या. तर रोहित शर्माने 56, सूर्यकुमार यादवने 25 आणि ईशान किशनने 14 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 200 धावा करत मुंबईला विजयासाठी 201 धावांचे आव्हान दिले.

मुंबईचा डाव

याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर ईशान किशन तिसऱ्या षटकात 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनने डाव पुढे नेत दुसऱ्या गड्यासाठी 128 धावांची भागीदारी केली. चौदाव्या षटकात रोहित शर्माला 56 धावांवर बाद करत मयंक डागरने ही जोडी फोडली. त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादवने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.

पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड

अशा पडल्या मुंबईच्या विकेट

  • पहिलीः तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने ईशान किशनला हॅरी ब्रूकच्या हाती झेलबाद केले.
  • दुसरीः चौदाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मयंक डागरने रोहित शर्माला नितीश कुमार रेड्डीच्या हाती झेलबाद केले.

हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक 83 धावा केल्या. त्यानंतर विव्रांत शर्माने 69, हेन्रिक क्लासेनने 18, तर एडन मार्करमने 13 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने 4, क्रिस जॉर्डनने 1 विकेट घेतली.

हैदराबादचा डाव

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला ओपनर मयंक अग्रवाल आणि विव्रांत शर्माने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 140 धावांची भागीदारी केली. चौदाव्या षटकात विव्रांत शर्माला 69 धावांवर बाद करत आकाश मधवालने ही जोडी फोडली. मधवालनेच नंतर सतराव्या षटकात मयंक अग्रवाललाही 83 धावांवर बाद केले. तर अठराव्या षटकात क्रिस जॉर्डनने ग्लेन फिलिप्सला 1 धावेवर बाद केले. तर एकोणिसाव्या षटकात मधवालने हेन्रिक क्लासेनला 18 धावांवर, तर हॅरी ब्रूकला शून्यावर बाद केले. त्यानंतर सनवीर आणि मारक्रमने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 200 वर नेली.

अशा पडल्या हैदराबादच्या विकेट

  • पहिलीः चौदाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आकाश मधवालने विव्रांत शर्माला रमनदीप सिंहच्या हाती झेलबाद केले.
  • दुसरीः सतराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आकाश मधवालने मयंक अग्रवालला ईशान किशनच्या हाती झेलबाद केले.
  • तिसरीः अठराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर क्रिस जॉर्डनने ग्लेन फिलिप्सला कुमार कार्तिकेयच्या हाती झेलबाद केले.
  • चौथीः एकोणिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आकाश मधवालने हेन्रिक क्लासेनला बोल्ड केले.
  • पाचवीः एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आकाश मधवालने हॅरी ब्रूकला बोल्ड केले.

3 पॉईंट्समध्ये जाणून घ्या, मुंबई प्लेऑफमध्ये कशी पात्र ठरू शकते

  1. मुंबईने SRH ला पराभूत करावेआणि RCB चा रात्रीच्या सामन्यात पराभव व्हावा.
  2. मुंबईने 11.3 षटकांपेक्षा कमी षटकात सामना जिंकावा, त्यामुळे त्यांचा रनरेट RCB पेक्षा जास्त होईल. तसेच, आरसीबीने मोठ्या फरकाने सामने जिंकू नयेत अशी प्रार्थना करावी.
  3. मुंबईने एसआरएचला हरवले आणि रात्रीचा सामना पावसामुळे रद्द झाला तर या स्थितीत मुंबई 16 गुणांसह पात्र ठरेल.

मुंबईत एक, SRH मध्ये 4 बदल
मुंबईने आपल्या संघात बदल केला आहे. हृतिक शोकीनच्या जागी कुमार कार्तिकेयला संधी मिळाली आहे. मयंक अग्रवाल एसआरएचमध्ये परतला आहे, विव्रत शर्मासह सनवीर सिंग आणि उमरान मलिक यांनाही संधी देण्यात आली आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11...

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.
इम्पॅक्ट खेळाडू: हृतिक शोकीन, अर्शद खान, ट्रिस्टन स्टब्स, तिलक वर्मा आणि राइली मेरेडिथ.

सनरायझर्स हैदराबादः एडन मार्कराम (कर्णधार), मयांक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, विव्रांत शर्मा, उमरान मलिक, सनवीर सिंग, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार आणि नितीश रेड्डी.
इम्पॅक्ट खेळाडू: टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा.

मुंबईला मोठा विजय आवश्यक
या मोसमात मुंबईने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी सात जिंकले आणि सहा सामने गमावले. संघाचे 14 गुण आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी संघाला 80 पेक्षा जास्त धावांनी विजय आवश्यक आहे. त्याचवेळी, संध्याकाळचा सामना जिंकला तरी बंगळुरूचा रनरेट त्यांच्यापेक्षा जास्त असता कामा नये, अशी त्यांची इच्छा राहील.

हैदराबादविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन आणि जेसन बेहरेनडॉर्फ असू शकतात. याशिवाय सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि पियुष चावला हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

हैदराबादने 13 पैकी केवळ चार सामने जिंकले
हैदराबादने या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने फक्त चार जिंकले आणि नऊ सामने गमावले. संघाचे आठ गुण आहेत आणि गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

मुंबईविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, हॅरी ब्रूक आणि ग्लेन फिलिप्स असू शकतात.

मुंबई हैदराबादवर भारी
मुंबई आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबईने 11 तर हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत.

खेळपट्टीचा अहवाल
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना अनुकूल राहिली आहे. आणि या मैदानावर गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागते.

हवामान स्थिती
रविवारी मुंबईचे वातावरण उष्ण असणार आहे. या दिवशी तापमान 28 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. ढगाळ वातावरण असेल, पावसाची शक्यता नाही.