आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यकुमार म्हणाला- पत्नीसमोर माझे पहिले शतक:माझी तीनही शतके तिने मिस केली; संपूर्ण कुटुंबाला स्टेडियममध्ये पाहून आनंद झाला

क्रीडा डेस्क21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई इंडियन्स (MI) चा सूर्यकुमार यादव शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध खेळलेल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर म्हणाला, 'स्टेडियममध्ये संपूर्ण कुटुंबाला, विशेषत: देविशाला पाहून चांगले वाटले. कारण तिने माझी तीनही आंतरराष्ट्रीय टी-20 शतके हुकवली आहेत. ती मॅच पाहायला येऊ शकली नव्हती.

तो पुढे म्हणाला, 'पण, आता ती स्टेडियममध्ये होती आणि माझे शतक झाले हे खूप छान झाले, आता देविशा स्टेडियममध्ये आली आणि त्यामुळेच मी शतक करू शकलो नाही असे म्हणण्याची संधी कोणाला मिळणार नाही.'

गुजरातविरुद्ध 103 धावांची नाबाद खेळी

गुजरातविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने शतक पूर्ण केले. या शानदार कामगिरीसाठी सूर्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात मुंबईने गुजरातचा 27 धावांनी पराभव केला. सूर्याने 103 धावांच्या नाबाद खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले. आयपीएलच्या इतिहासातील सूर्याची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

रोहित शर्मानेही कौतुक केले

संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही सूर्याच्या खेळीचे कौतुक केले. सामन्यानंतर तो म्हणाला की, खरे सांगायचे तर सूर्याचा आत्मविश्वास कमालीचा आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला उजव्या आणि डावखुरा अशा कॉम्बिनेशनने जायचे की नाही यावर आम्ही चर्चा करत होतो. सूर्या म्हणाला नाही, मला आधी फलंदाजीला जायचे आहे. तो कधीच मागे वळून पाहत नाही.