आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:तामिळनाडूच्या आमदाराने केली CSKवर बंदीची मागणी; म्हणाले- नाव आमचे आणि खेळाडू बाहेरचे, विधानसभेत गोंधळ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. IPL-2023 मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने तीन सामने खेळले असून यातील 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. 12 एप्रिल रोजी चेन्नईचे होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडीयमवर चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. परंतू यापूर्वीच चेन्नई सुपरकिंग्स संघावरून तामिळनाडूच्या विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला आहे.

PMK पक्षाच्या आमदाराने विधानसभेत घातला गोंधळ

तामिळनाडूच्या विधानसभेत मंगळवारी पीएमकेच्या आमदाराने आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स टीम मध्ये एकही तामिळ खेळाडू नसल्याने आक्षेप घेतला. एवढेच नाही तर यावरून चेन्नई सुपरकिंग्सवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तामिळनाडूच्या विधानसभेत स्पोर्ट्सवरील अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान, धर्मपुरीचे PMK आमदार व्यंकटेश्वरन यांनी या संबंधी मागणी केली. चेन्नई सुपरकिंग्स ही टीम तामिळनाडूला रिप्रेझेन्ट करत असली तरी त्यात तामिळ खेळाडूंना महत्व दिले जात नाही, असा गंभीर आरोत त्यांनी केला.

या फोटोतील मफलर घातलेले आमदार व्यंकटेश्वरन आहेत. त्यांनी CSK टीमवर जोरदार आरोप केले.
या फोटोतील मफलर घातलेले आमदार व्यंकटेश्वरन आहेत. त्यांनी CSK टीमवर जोरदार आरोप केले.

तमिळ लोकांना महत्त्व नाही, नाव आमचे मग खेळाडू बाहेरचे का

विधानभवनात बोलताना आमदार व्यंकटेश्वरन म्हणाले की, तामिळनाडूमध्ये अनेक खेळाडू आहेत. चेन्नई सुपर किंग्ज ही तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या नावावर आहे. तरी देखील संघात एकही तामिळ खेळाडू नसणे हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यावर कारवाई करतील, याची मला खात्री आहे. तामिळनाडूत तमिळ लोकांना महत्त्व दिले नाही तर त्यांना इतरत्र कुठेही महत्व दिले जाणार नाही.

सरकारकडून काय पाऊल उचलले जातील याकडे लक्ष
व्यंकटेश्वरन यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर तामिळनाडू सरकारकडून कोणती पावले उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा

आयपीएलमध्ये आज CSK v/s RR:चेपॉकमध्ये चेन्नईचा विक्रम चांगला, बॅटिंग पीचवर राजस्थान धोकादायक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लीग स्टेजचा सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजेपासून हा सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत 3 सामने खेळले असून, 2 जिंकले आणि एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. - येथे वाचा संपूर्ण बातमी