आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर IPL सस्पेंड:कोरोनामुळे IPL चे पूर्ण सीझनच स्थगित, क्रिकेटर्ससह स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्यानंतर घेतला निर्णय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर आयपीएलचे पूर्ण सीझन स्थगित करण्यात आले आहे. 7 खेळाडूंसह काही स्टाफ मेंबर्सला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अशात आयपीएलचे सीझन रद्द करावे अशी मागणी सगळीकडून केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएल सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात PSL ची सुरुवात झाली होती, पण 6 खेळाडूंसह 8 जण कोरोना संक्रमित झाले होते. तेव्हा पाकिस्तानने अचानक पीएसएल गुंडाळण्याचा निर्णय घेतला. पण, आयपीएलमध्ये 7 क्रिकेटर्सला कोरोना झाल्यानंतरही BCCI कसली वाट पाहत आहे असा सवाल उपस्थित केला जात होता. तत्पूर्वी आयपीएलचे सामने एकाच ठिकाणी मुंबईतील 3 मैदानांवर घेणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, वाढत्या दबावानंतर अखेर आयपीएलचे सीझन सस्पेंड करावे लागले आहे.

रिपोर्ट्सनुसार, चेन्नईचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजीसह दोन स्टाफ मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, किंग्स इलेवन पंजाबमधील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. IPL मध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी KKR चा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी, नीतीश राणा (KKR), अक्षर पटेल (DC), डेनियल सैम्स (RCB), एनरिक नॉर्खिया (DC) आणि देवदत्त पडिक्कल (RCB) ला कोरोनाची लागण झाली आहे.

...तर, BCCI ला 2 हजार कोटींचे नुकसान
IPL टाळण्यात आले आल्याने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आयपीएल पूर्णपणे रद्द झाल्यास बीसीसीआयला तब्बल 2000 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. सोबतच, यावर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर देखील आता धोक्याची घंटा आहे. देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे भारताकडून आयोजनाचा मान परत घेतला जाऊ शकतो. त्यात सुद्धा वेगळा हजारो कोटींचा फटका बीसीसीआयला बसू शकतो.

बातम्या आणखी आहेत...