आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच प्रिव्ह्यू:भारतीय संघाच्या भविष्यातील दोन कर्णधारांची आज लढत, दिल्ली व लखनऊ यांचा सामना सायंकाळी 7.30 वाजेपासून रंगणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या १५ व्या सत्रातील १५ वा सामना अशा दोन संघांमध्ये खेळला जात आहे, ज्यांच्या कर्णधारांना तज्ज्ञांनी भावी भारतीय संघाचा कर्णधार म्हटले आहे. दोघांनीही आपल्या खेळाने ते सिद्ध केले आहे. हे आहेत के.एल. राहुल व ऋषभ पंत. राहुलकडे लखनऊ सुपर जायंट्सच्या नव्या संघाचे नेतृत्व आहे, तर पंतने दिल्लीचे कर्णधारपद स्वीकारले आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही कर्णधारांच्या रणनीती कौशल्याची चाचणी घेतली जाईल. या सामन्यात राहुल व पंतला पुन्हा एकदा त्यांच्या चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागले. भारतीय संघाला पुढील काही वर्षांत भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. कर्णधार रोहित शर्मालाही कामाचा ताण सांभाळावा लागेल. यासोबतच भावी कर्णधारांचाही शोध घ्यावा लागणार आहे. आयपीएल हे एक चांगले व्यासपीठ असेल, जिथे राहुल आणि पंत यांची चाचणी घेता येईल. दोघांनाही आपला दावा मजबूत करायचा आहे. यंदा लखनऊ आणि दिल्ली पहिल्यांदाच आमने-सामने येतील.

दिल्ली कॅपिटल्स : विजयास उत्सुक
वॉर्नर पृथ्वी शॉसह डावाची सुरुवात करेल, सिफर्ट बाहेर होऊ शकतो. दिल्लीचे सहायक प्रशिक्षक शेन वॉटसन म्हणाले, “वॉर्नर क्वॉरंटाइनच्या बाहेर आला आहे व तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल. नोर्तेजेने गेल्या काही आठवड्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता तेही निवडीसाठी उपलब्ध असेल. त्याचबरोबर नोर्तेंजेसाठी रोव्हमन पॉवेल किंवा मुस्तफिझूरला वगळले जाऊ शकते. वॉर्नरच्या आगमनाने संघाची सलामी अधिक मजबूत झाली आहे. तो पृथ्वी शॉसोबत डावाची सुरुवात करेल. ललित यादवचा आत्मविश्वास प्रत्येक सामन्यानंतर वाढत आहे. मात्र, अनुभवी मनदीप सिंग फलंदाजीत सर्वात कमकुवत ठरतोय.

लखनऊ सुपर जायंट्स : स्टोइनिस परतला
स्टोइनिसच्या आगमनाने संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मजबूत होईल. तो अँड्रयू टाय किंवा एविन लुइसची जागा घेऊ शकतो. दोन्ही संघांसाठी गोलंदाजी ही समस्या आहे, शेवटच्या सामन्यात जेसन होल्डरने शेवटच्या षटकात ३ बळी घेतले. राहुलने चेन्नई व हैदराबादविरुद्ध चांगली खेळी केली होती. डिकॉककडूनही चेन्नईविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. गोलंदाजीची जबाबदारी पुन्हा आवेश खानच्या खांद्यावर असेल. त्यांच्याशिवाय टाय, कृणाल, होल्डर हेही दिल्लीची फलंदाजी रोखण्यासाठी उतरतील.

बातम्या आणखी आहेत...