आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • The Super Kings Of Chennai; Kolkata's Fast Bowling Edge Blunt, Mumbai Indian Cricket Crown To Play Under New Leadership This Season | Marathi News

दिव्य मराठी अ‍ॅनालिसिस:सुपर ऑलराउंडर आहेत चेन्नई संघाचे किंग्ज; कोलकात्याच्या वेगवान गोलंदाजीची धार बोथट, यंदाच्या सत्रात नव्या नेतृत्वात खेळणार मुंबई

दिव्य मराठी अॅनालिसिस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपर ऑलराउंडर आहेत चेन्नई संघाचे किंग्ज; कोलकात्याच्या वेगवान गोलंदाजीची धार बोथट, यंदाच्या सत्रात नव्या नेतृत्वात खेळणार मुंबई भारतीय क्रिकेटचा मुकुट मानला जाणारी सर्वात लाेकप्रिय स्पर्धा आयपीएल आता शनिवारपासून मैदानावर रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर आज सलामी सामना रंगणार आहे. रवींद्र जडेजाच्या नव्या नेतृत्वाखाली गत चॅम्पियन चेन्नई सुपकिंग्ज संघ सलामीला गत उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध झंुज देणार आहे. चेन्नई संघाचे ऑलरांऊडर हेच खरे सुपर किंग्ज मानले जातात. त्यामुळे या सामन्यात चेन्नईच्या विजयी सलामीचे पारडे जड आहे. दुसरीकडे कोलकाता संघाच्या वेगवान गोलंदाजांची धारही बोथट झाली आहे.

२०११ नंतर पहिल्यांदाच जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या टी-२० ट्राॅफीसाठी १० संघांमध्ये झंुज रंगणार आहे. यंदापासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स संघ नव्याने सहभागी झाले आहेत. या दाेन्ही संघांचे मूल्य जवळपास १२,७१५ कोटी रुपये आहे. त्यामुळे आयपीएलचे व्हॅल्यूही वेगात वाढले आहे.

या लीगची जागतिकस्तरावर चर्चा आहे. त्यामुळेच मँचेस्टर युनायटेड फुटबाॅल क्लबने आयपीएलमध्ये संघ खरेदीसाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना टीम खरेदी करता आली नाही.

आता दहा संघ सहभागी असलेल्या यंदाच्या सत्रात तब्बल ७४ सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना ६५ दिवस सर्वाेत्तम खेळीने रंगणाऱ्या सामन्यांची खास पर्वणीच आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज : रवींद्र जडेजावर यशस्वी कामगिरीचा धाेनीचा वारसा जपण्याची जबाबदारी धाेनीने सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय जाहीर करताना रवींद्र जडेजाकडे चेन्नई संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवली. त्यामुळे जडेजावर नव्याने एक जबाबदारी पडली. याच कामगिरीचा वारसा अविरतपणे कायम ठेवण्यासाठी जडेजाला मेहनत करावी लागणार आहे.

खास नजर : ऋतुराज गायकवाड गतसत्रातील आपल्या सर्वाेत्तम कामगिरीला उजाळा देऊ शकतो.

जमेची बाजू : ब्राव्हो, जडेजा, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, डॅ््वेन प्रिटाेरियसच्या रूपात टीमकडे सर्वाेत्तम दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. तसेच अनेक पर्यायही आहेत त्यामुळे कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माेईन अलीही ऑलराउंडरच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.
दुबळेपण : शार्दूल ठाकूरच्या अनुपस्थिती व वर्ल्ड क्लास स्पिनर्सच्या अभावात जडेजाला माेठी मेहनत करावी लागेल. दीपक चहर अनफिट आहे. मिस्ट्री स्पिनर महिश मैदानावर उतरण्याची शक्यता अद्याप कमी आहे. जाॅर्डन, मिशेल सॅटनर व अॅडम मिल्ने अाहेत, मात्र, या सर्वांमध्ये काही दुबळ्या बाजू आहेत.

दिनांक वेळ 26 मार्च केकेआर सायं. 7.30 वा. 31 मार्च लखनऊ सायं. 7.30 वा. 3 एप्रिल पंजाब सायं. 7.30 वा. 9 एप्रिल हैदराबाद दु. 3.30 वा. 12 एप्रिल बंगळुरू सायं. 7.30 वा. 17 एप्रिल गुजरात सायं. 7.30 वा. 21 एप्रिल मुंबई सायं. 7.30 वा. 25 एप्रिल पंजाब सायं. 7.30 वा. 1 मे हैदराबाद सायं. 7.30 वा. 4 मे बंगळुरू सायं. 7.30 वा. 8 मे दिल्ली सायं. 7.30 वा. 12 मे मुंबई सायं. 7.30 वा. 15 मे गुजरात सायं. 7.30 वा. 20 मे राजस्थान सायं. 7.30 वा.

कोलकाता नाइट रायडर्स : गोलंदाजीचा दर्जा सुधारण्याची गरज; अय्यर दमदार सुरुवात करणार! चेन्नई सुपरकिंग्जपाठाेपाठ कोलकाता नाइट रायडर्सही यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या नेतृत्वात खेळणार आहे. कोलकाता संघाने पुन्हा एकदा आयपीएल चॅम्पियन होण्याच्या इराद्याने अनेक माेठे बदल केले. यात खांदे पालटचाही माेठा निर्णय घेण्यात आला.

खास नजर : ऑलराउंडर स्किलमुळे व्यंकटेश अय्यर सध्या यंदाच्या सत्रात चर्चेत आहे.
जमेची बाजू
: कोलकाता संघाची भर सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूवर आहे. त्यामुळेच शिवम मवी, नितीश राणा आणि रिंकू सिंगवर विश्वास ठेवण्यात आला. या तिघांकडून टीमला माेठी अपेक्षा आहे. तसेच श्रेयस अय्यर आता नव्या नेतृत्वात दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या नेतृत्वात दिल्ली टीमचीही कामगिरी काैतुकास्पद ठरली होती. आता त्याचा कोलकाता संघाला किताब जिंकून देण्याचा मानस आहे. पॅट कमिन्स आणि अॅराेन फिंच हे ६ एप्रिलनंतर संघाकडून खेळणार आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यात अय्यरला लाइनअप मजबूत करावी लागणार आहे.
दुबळेपण : गोलंदाजी हाच सध्या कोलकाता संघाला भेडसावणारा माेठा प्रश्न आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धार बोथट असल्याचे दिसते. साऊथी, उमेश आणि युवा रसिख डार आहे, मात्र, या सर्वांचा पेस अॅटक दुबळा मानला जातो.

दिनांक वेळ 26 मार्च चेन्नई सायं. 7.30 वा. 30 मार्च बंगळुरू सायं. 7.30 वा. 1 एप्रिल पंजाब सायं. 7.30 वा. 6 एप्रिल मुंबई सायं. 7.30 वा. 10 एप्रिल दिल्ली दु. 3.30 वा 15 एप्रिल हैदराबाद सायं. 7.30 वा. 18 एप्रिल राजस्थान सायं. 7.30 वा. 23 एप्रिल गुजरात दु. 3.30 वा. 28 एप्रिल दिल्ली सायं. 7.30 वा. 2 मे राजस्थान सायं. 7.30 वा. 7 मे लखनऊ सायं. 7.30 वा. 9 मे मुंबई सायं. 7.30 वा. 14 मे हैदराबाद सायं. 7.30 वा. 18 मे लखनऊ सायं. 7.30 वा.

बातम्या आणखी आहेत...