आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकेआरमध्ये सीईओ वेंकी म्हैसूरचा हस्तक्षेप:टीमने विविध 5 जोड्या आजमावल्या, सीईओची संघनिवडीतही दखल

कोलकाता5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या गेल्या सत्रातील उपविजेता संघ कोलकाता नाइट रायडर्सच्या शिबिरामध्ये अनेक समस्या आहेत. फ्रँचायझीचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचा संघ निवड आणि इतर कामात हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही सामन्यांमध्ये संघाची कामगिरीही घसरली आहे. सूत्रांनुसार, प्रेझेंटेशनमध्ये कर्णधार श्रेयस अय्यरने संघ निवडीत सीईओच्या सहभागावर बोलून मोठा प्रश्न उपस्थित केला. संघ व्यवस्थापन विशेषत: फ्रँचायझींचे सीईओ संघ निवडीत कमालीचा हस्तक्षेप करत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय संघातील बदलाबाबत तो म्हणाला, “आम्हाला खेळाडूंना सांगणे खूप कठीण वाटते की, तुम्ही पुढच्या सामन्यात खेळणार नाही. प्रत्येक खेळाडू निवडीसाठी चांगली कामगिरी करतो.’ संघाने यंदाच्या सत्रात १२ सामन्यांमध्ये ५ वेगवेगळ्या सलामीवीर जाेडीचा वापर केला. यावरून संघात सातत्य नसल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...