आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबल हेडरचा थरार:आज गुजरात-काेलकाता, हैदराबाद-पंजाब सामना; गुजरात, पंजाबला तिसऱ्या विजयाची संधी

अहमदाबाद/हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गत चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि शिखर धवनच्या नेतृत्वात पंजाब किंग्ज यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलमध्ये विजयी हॅट््ट्रिक साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आतापर्यंतच्या सर्वाेत्तम कामगिरीमुळे या दाेन्ही संघांना सलग तिसऱ्या विजयाची संधी आहे. गुजरात संघाचा लीगमधील सामना आज रविवारी आपल्या घरच्या मैदानावर काेलकाता नाइट रायडर्स टीमशी हाेणार आहे. हे दाेन्ही संघ दुपारी ३.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. गुजरात संघाने सलग दाेन विजयांसह आपला दबदबा कायम ठेवला आहे.

काेलकाता संघाने गत सामन्यातील विजयाने लीगमध्ये पुनरागमन केले. तसेच गत सामन्यातील पराभवातून सावरलेल्या यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाला घरच्या मैदानावर पंजाबच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. हे दाेन्ही संघ सायंकाळी ३.३० वाजेपासून हैदराबादच्या मैदानावर झंुज देणार आहेत. पंजाब संघाच्या नावे सलग दाेन विजयांची नाेंद आहे. यामुळे पंजाब सलग तिसरा सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहे.

अहमदाबादच्या मैदानावर आज २० स्टार उतरणार : गुजरात टायटन्स संघ आता आयपीएलमध्ये काेलकाता टीमवर सलग तिसरा विजय संपादन करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच घरच्या मैदानावर बंगळुरूचा पराभव करत काेलकाता संघाला लीगमध्ये विजयाचे खाते उघडता आले. त्यामुळे काेलकाता संघाला आता आपली ही लय कायम ठेवण्यासाठी माेठी कसरत करावी लागणार आहे. गुजरात आणि काेलकाता संघांच्या माध्यमातून २० स्टार अहमदाबादच्या मैदानावर उतरणार आहेत.