आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • This Is The Last World Cup For Karthik A Special Strategy By The Selection Committee For The New Indian T20 Team

कार्तिकसाठी हा शेवटचा विश्वचषक:नव्या भारतीय टी-20 संघासाठी निवड समितीचे खास डावपेच

चंद्रेश नारायणन | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने आता भविष्यातील टी-२० च्या मजबूत संघाबाबतचे संकेत दिले आहेत. यासाठी निवड समितीने आता विश्वचषकानंतर हाेणाऱ्या न्यूझीलंड दाैऱ्यातील टी-२० मालिकेसाठी सर्वाेत्तम खेळाडूंची निवड केली. यादरम्यान निवड समितीने सध्या जायबंदी असलेल्या यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. यातून आता कार्तिकसाठी हा शेवटचाच वर्ल्डकप ठरण्याचे चित्र आहे. यादरम्यान निवड समितीने आश्विनलाही संधी दिली नाही. त्यामुळे या दाेन्ही दिग्गजांना आता हा निवृत्तीबाबतचा माेठा संकेत मानला जात आहे. मात्र, याबाबत निवड समितीने अधिकृत अशी काेणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, याच दिशेने निवड समितीची कार्यपद्धती प्लॅन आखत असल्याचे दिसून येत आहे. दिनेश कार्तिक सध्या पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे सध्याच्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याने यंदा जूनमध्ये टी-२० संघात नाट्यमय पुनरागमन केले. मात्र, त्याला या विश्वचषकात समाधानकारक खेळी करता आली नाही. ३७ वर्षांचा कार्तिक पुन्हा टी-२० संघात कमबॅक करेल असे वाटत नाही. त्यापाठाेपाठ सध्या आश्विनला न्यूझीलंड दौऱ्यासाठी वनडे व टी-२० या दोन्ही संघांतून वगळले आहे.

पृथ्वीपेक्षा शुभमानला प्राधान्य; दाेन्ही दाैऱ्यांसाठी युवांना संधी निवड समितीने साेमवारी विश्वचषकानंतर भारताच्या आगामी न्यूझीलंड आणि बांगलादेश दाैऱ्यासाठी संघांची घाेषणा केली. यादरम्यान दाैऱ्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर अधिक भर देण्यात आला. यातून न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० संघात शुभमान गिलची निवड आश्चर्यकारक आहे. मुंबई आणि दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ या धोकादायक फलंदाजापेक्षा शुभमानला प्राधान्य देण्यात आले आहे. सध्याच्या देशांतर्गत हंगामात पृथ्वी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याची अनुपस्थिती आश्चर्यकारक आहे. मात्र बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कोणतेही महत्त्वाचे बदल केले नाहीत. राेहितकडेच कसाेटी संघाच्या नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली. यादरम्यान निवडीचा सर्वात चांगली गाेष्ट म्हणजे शिखर धवनला पुन्हा एकदा वनडे संघात कमबॅक करण्याची संधी दिली. यादरम्यान त्याच्याकडे न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...