आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रविवारी 2 सामने झाले. राजस्थानने पहिल्या सामन्यात हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. बंगळुरूने मुंबईविरुद्धचा दुसरा सामना 8 गडी राखून जिंकला. बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी स्फोटक भागीदारी केली. दरम्यान, या सामन्यात पराभवानंतरही मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 84 धावांची झंझावाती खेळी केली.
मुंबईकडून खेळतांना बंगळुरुविरुद्ध तिलक वर्माने नाबाद 84 धावा केल्या. मात्र, मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचे हार्ड हिटर फोल ठरल्यावर डावखुरा फलंदाज तिलक वर्मा याने एकहाती डाव सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तिलक वर्माने 46 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 84 धावा केल्या. वर्माने षटकार ठोकत 32 चेंडूत त्याचे अर्धशतक देखील पूर्ण केले.
तिलक वर्माचा हेलिकॉप्टर शॉट आणि धोनीची आठवण
बंगळुरुविरुद्ध मुंबईकडून खेळतांना तिलक वर्माने शेवटच्या चेंडूवर मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलला महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल हेलिकॉप्ट शॉट मारत षटकार ठोकून सर्वांची मने जिंकली. तिलक वर्माच्या हेलिकॉप्टर शॉट पाहून चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. सामना संपल्यानंतरही सोशल मीडियावर अनेकांनी तिलक वर्माचे कौतूक करत धोनीची आठवण काढली. त्याचा हा शॉट धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट प्रमाणेच असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.
तिलक वर्माने गेल्या आयपीएलमध्ये देखील चांगली खेळी केली होती. त्या वेळी दिव्य मराठी नेटवर्कने तिलक वर्माचा इंटरव्ह्यू केला होता. आता या निमित्त तो पुन्हा वाचा..
IPL मधील 'बेघर' खेळाडूची मुलाखत:मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मा म्हणाला, 'माझे वडील इलेक्ट्रिशियन आहेत, त्यांचे घरही नाही; पहिल्या कमाईतून घर घेणार
IPL मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने हैदराबादचा सलामीवीर तिलक वर्माला 1.70 कोटी रुपयांना खरेदी केले. तिलक वर्मा याचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. त्यांना स्वतःचे घरही नाही. घरचा खर्चही मोठ्या कष्टाने भागतो, पण वडिलांनी आर्थिक परिस्थितीचा परिणाम तिलकच्या क्रिकेटपटू होण्याच्या स्वप्नावर झाला नाही. तिलक आणि त्यांच्या थोरल्या भावाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या इच्छांचाही त्याग केला. तिलक वर्मा 2020 च्या अंडर-19 विश्वचषक संघाचा देखील भाग आहे. आता तिलकला आयपीएलमध्ये मिळालेल्या रकमेतून घर खरेदी करून वडिलांना भेट देण्याची इच्छा आहे. दैनिक 'भास्कर'ने तिलक वर्मा याच्याशी त्याच्या कारकिर्दीतील आव्हाने आणि भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली. पूर्ण बातमी वाचा..
तिलक वर्माशी संबंधित गेल्या आयपीएलमधील ही बातमी देखील वाचा..
मॅक्सवेल ने करुन दिली जॉन्टी रोड्सची आठवण:फक्त 2.38 सेकंदात टिळक वर्माला केले रन आऊट
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.