आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:आयपीएल खेळणारा डेव्हिड सिंगापूरचा पहिला क्रिकेटपटू; हसरंगा, चमीरा व डेव्हिड बंगळुरूसाेबत करारबद्ध

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२१ च्या उर्वरित सत्रासाठी ३ खेळाडूंना आपल्या सोबत जोडले, ज्यात श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदू हसरंगा व वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमीरासह सिंगापूरचा टीम डेव्हिड यांचा समावेश आहे. डेव्हिड स्पर्धेत खेळणारा सिंगापूरचा पहिला खेळाडू ठरेल. २५ वर्षीय डेव्हिडने सिंगापूरसाठी १४ टी-२० सामने खेळले आहेत. त्याचबरोबर, पीएसएल, बिग बॅश व टी-२० ब्लास्टमध्ये देखील खेळला. २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला हसरंगाने ६.५६ च्या इकॉनॉमीने धावा देत ३३ बळी घेतले. तो तळाला फलंदाजी करत वेगाने धावा देखील करतो.

बंगळुरू संघातील न्यूझीलंडचा फिन अॅलन आणि स्कॉट कुग्लेजन बांगलादेश विरुद्ध मालिकेत सहभागी होत आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या अॅडम जम्पा, डॅनियल सॅम्स व केन रिचर्डसनने नाव मागे घेतले आहे.

सायमन कॅटिचने मुख्य प्रशिक्षक पद सोडले : बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिचने वैयक्तिक कारणामुळे आपले पद सोडले. उर्वरित सत्रात संघाचे क्रिकेट संचालक माइक हेसन मुख्य प्रशिक्षकांची जबाबदारी पार पाडतील. हेसनने यापूर्वी न्यूझीलंड व पंजाब किंग्जसाठीही जबाबदारी पार पाडली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ यूएईत दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...