आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022:आज नंबर-1 Vs नंबर-10, रोहितच्या मुंबईसमोर हार्दिकच्या गुजरातचे आव्हान

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलगच्या पराभवाने यंदा अडचणीत सापडलेला पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ विजयासाठी उत्सुक आहे. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाला शुक्रवारी फाॅर्मात असलेल्या हार्दिकच्या गुजरात टायटन्स टीमच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर हे दाेन्ही संघ आज समोरासमोर असतील. त्यामुळे आज आयपीएलमध्ये गुणतालिकेत नंबर वन आणि दहाव्या स्थानावरील संघांमध्ये सामना रंगणार आहे. गुजरात संघाने ८ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आठ पराभवांमुळे मुंबई संघ गुणतालिकेमध्ये तळात दहाव्या स्थानावर आहे. गुजरात संघाला सलग पाच विजयांनंतर गत सामन्यामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले हाेते.

बातम्या आणखी आहेत...