आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL च्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या किरॉन पोलार्डचा आज वाढदिवस आहे. तो 35 वर्षांचा झाला आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या पोलार्डने वेस्ट इंडिज संघाचा एकदिवसीय कर्णधारपदही भूषवले आहे. पोलार्डचा वाढदिवस मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच लकी ठरला आहे. या दिवशी मुंबईने एकही सामना गमावलेला नाही.
पोलार्ड 2010 मध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाला, तेव्हापासून तो या संघाचा भाग आहे. पोलार्डच्या वाढदिवशी म्हणजेच 12 मे रोजी मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तीनही सामने जिंकले आहेत.
2012 मध्ये पोलार्डच्या वाढदिवशी मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पहिला सामना खेळला होता. या सामन्यात मुंबईने KKR चा 27 धावांनी पराभव केला. या सामन्यात पोलार्डला फलंदाजीची संधी मिळाली नाही. दुसरीकडे, पोलार्डच्या वाढदिवसाला मुंबईने सनरायझर्स हैदराबादचा सामना केला. या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. पोलार्डने 7 चेंडूत 6 धावा केल्या.
2019 मध्ये पोलार्डच्या वाढदिवशी मुंबईने पटकावले होते विजेतेपद
त्याचवेळी पोलार्डच्या वाढदिवसादिवशी मुंबईने IPL फायनलमध्ये CSK चा पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमहर्षक विजेतेपदाच्या सामन्यात मुंबईने डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अंतिम सामन्यात लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकूरला बाद करून मुंबईला विजय मिळवून दिला.
पोलार्डची या हंगामात कामगिरी निराशाजनक
पोलार्डची या मोसमात चांगली कामगिरी झालेली नाही. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये केवळ 144 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 25 आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ IPL च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.