आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2023:आयपीएल 2008 मध्ये होता बॉल बॉय होता, आता ठरला प्रभावशाली खेळाडू; वाचा, तुषार देशपांडेचा प्रवास

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुषार देशपांडे हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. 16व्या मोसमात तो CSKचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तुषारच्या या प्रवासात अनेक चढ-उतार देखील आले आहेत. त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा घेऊयात...

IPL 2022 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने तुषार देशपांडेला त्याच्या 20 लाखांच्या ब्रेस प्राइजमध्ये विकत घेतले. गेल्या मोसमात चेन्नईने त्याला केवळ दोन सामन्यांत खेळण्याची संधी दिली होती. ज्यामध्ये तो एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

आयपीएल 2023 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जने तुषार देशपांडेवर विश्वास ठेवला आणि पहिल्याच सामन्यापासून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. तुषार कर्णधार एमएस धोनीच्या अपेक्षेप्रमाणे खेळला. त्याने 16 व्या मोसमात चेन्नईकडून आतापर्यंत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 31 धावांत 2 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

आयपीएल 2008 मध्ये होता बॉल बॉय

2008 मध्ये खेळलेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात तुषार देशपांडे हा बॉल बॉय होता. त्या काळात तो मुंबईच्या 13 वर्षांखालील संघाचा भाग होता. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात बॉल बॉय असताना, त्याने सचिन तेंडुलकरसह जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना जवळून पाहिले.

पहिला प्रभावशाली खेळाडू

तुषार देशपांडे हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिला प्रभावशाली खेळाडू आहे. 31 मार्च रोजी, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 16व्या हंगामाचा सलामीचा सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधार एमएस धोनीने अंबाती रायडूच्या जागी तुषार देशपांडेचा प्रभावशाली खेळाडू म्हणून समावेश केला. चेन्नईकडून फलंदाजी रायुडू आणि गोलंदाजी तुषार देशपांडे यांनी केली.

तुषार देशपांडेने आयपीएल 2020 मध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग होता. 2020 च्या आयपीएलमध्ये त्याने दिल्लीसाठी 5 सामने खेळले आणि तीन विकेट घेतल्या. यानंतर तुषार 2022 मध्ये CSK संघात सामील झाला.

महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडू

  • तुषार देशपांडे हा महाराष्ट्रातील ठाण्यातील आहे.
  • 2016-17 मध्ये त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले.
  • 2 वर्षानंतर 2018 मध्ये, त्याने लिस्ट वन क्रिकेटमध्ये पदार्पण केले
  • 2018 मध्ये तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला.
  • 27 वर्षीय तुषार आयपीएलमध्ये दिल्ली आणि चेन्नई व्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो.
  • इंडिया ए आणि इंडिया ब्लू संघाकडूनही तुषार खेळला आहे.