आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरानची वेगवान गोलंदाजी:चेन्नईविरुद्ध आयपीएल 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला, लॉकी फर्ग्युसनचा रेकॉर्ड मोडला

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL 2022 युवा सेन्सेशन उमरान मलिकने रविवारी IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याच्या चेंडूचा वेग ताशी 154 किलोमीटर इतका होता. चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील दहावे षटक टाकण्यासाठी उमरान मलिक आला आणि त्याच षटकातील दुसऱ्या चेंडूचा वेग 154 किमी प्रतितास होता.

या सामन्यात ऋतुराज गायकवाड अप्रतिम फॉर्ममध्ये होता, त्याला बाद करणे सोपे नव्हते. मात्र, त्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी क्रिजवर आला तेव्हा उमरान मलिकने आणखी एक वेगवान चेंडू टाकला. त्याचा वेगही ताशी 154 किलोमीटर इतका होता. या चेंडूवर धोनीला एकही धाव करता आली नाही. तो एक यॉर्कर चेंडू होता. मात्र, उमरानला या सामन्यात एकही बळी घेता आला नाही. त्याने चार षटकांत 48 धावा दिल्या.

लॉकीचा विक्रम मोडला
चालू मोसमात सर्वात जलद चेंडू टाकण्याचा विक्रम उमरानच्या आधी लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने 153.9 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता . सामन्यानंतर उमरानला सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू टाकल्याबद्दल एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सलग 9 वेळा त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.

आयपीएल 2022 मध्ये 15 विकेट्स
या मोसमात उमरान मलिकने 9 सामन्यात 19.13 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 8.44 होता. गुजरातविरुद्धच्या सामन्यातही त्याने केवळ 25 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यानंतर उमरानने सांगितले होते की, एक दिवस तो 155 च्या वेगाने गोलंदाजी करण्याचाही प्रयत्न करेल.

उमरानवर गावसकर प्रभावित
उमरान मलिकच्या गोलंदाजीने प्रभावित होऊन सुनील गावसकर यांनी इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघात त्याचा समावेश करण्याची मागणी केली आहे. उमरानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही, पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करून त्याला खूप काही शिकण्याची संधी मिळेल, असे गावसकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...