आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांशिवाय तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहते. अनेकदा तिचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत जोडण्यात आले आहे. तर पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाहसोबतही तिचे नाव जोडले गेले आहे. अशात आता नसीम शाहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने उर्वशीसोबतच्या लग्नाविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर दिले आहे.
नसीम शाहचा व्हिडिओ व्हायरल
विशेष म्हणजे नसीम शाहने काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून उर्वशी रौतेलाचे काही फोटोही शेअर केले होते. यानंतर अशी चर्चा व्हायला लागली होती की उर्वशी आणि नसीम एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, आता व्हायरल होत असेलला व्हिडिओ एका पत्रकार परिषदेतील आहे. यात पत्रकार नसीम शाहला उर्वशीविषयी प्रश्न विचारताना दिसतात.
या प्रश्नाच्या उत्तरात नसीम शाह म्हणतो की, 'मी मेसेज दिला तर तुम्ही लोक व्हायरल करून टाकाल. नवरी तयार असेल तर लग्न करेल.' तथापि, या व्हिडियोत नसीम शाह उर्वशीचे नाव घेत नाही.
उर्वशीने शेअर केली होती रील
दरम्यान, उर्वशीने 2022 मध्ये नसीम शाहसोबतची एक रील तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केली होती. यानंतर दोघे डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र यानंतर नसीमने आपण कोणत्याही उर्वशीला ओळखत नाही असे म्हटले होते.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.