आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थँक गॉड इथे उर्वशी नाही':महिला फॅनने उर्वशी रौतेलाला केले ट्रोल, मीम्सही बनवले; दिल्लीचा सामना पाहण्यासाठी ऋषभ पंत गेला होता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना पाहण्यासाठी ऋषभ पंतही दिल्लीत आला होता. कारण कार अपघातानंतर पहिल्यांदाच ऋषभ पंत चाहत्यांसमोर आला होता. त्यामुळे ऋषभला पाहून चाहते देखील आनंदीत झाले. दरम्यान, गुजरातने दिल्लीला पराभूत केले असले तरी पंतच्या प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून चाहत्यांनी दुसरीकडे आनंद व्यक्त केला.

परंतू ऋषभ पंत दिल्लीचा सामना पाहण्यासाठी आल्यानंतर चित्रपट अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव बर कसे समोर येणार नाही. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, एका महिला फॅनचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चाहत्यांनी उर्वशी रौतेलाबद्दल मीम्स शेअर केले. जे आता चित्रपट अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

मुळात महिला फॅनने तिच्या हातात एक प्लेइंग कार्ड ठेवले होते. त्यावर लिहिले होते की, देवाचे आभार उर्वशी येथे नाही. महिला चाहत्याचा हा मेसेज सोशल मीडियावर मीमचे काम केले. तर उर्वशी रौतेलाने हा मेसेज पॉझिटिव्ह म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. उर्वशीने महिला चाहत्याचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, 'का..', त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आणि चाहत्यांनी त्यावर जोरदार कमेंट करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी उर्वशीनेही हा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर करत लिहिले की- 'स्वतःच्या आयुष्याचे प्रेक्षक बनणे म्हणजे जीवनातील दुःखातून सुटका होणे म्हणता येईल'

पंतचा अपघातानंतर उर्वशीने केली होती पोस्ट
ऋषभचा कार अपघात झाला तेव्हाही उर्वशीने त्यावर प्रतिक्रिया दिली आणि पंत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी दोघांनी एकमेकांसाठी सोशल मीडियावर अनेक गूढ पोस्ट टाकल्या होत्या, ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

सामन्यानंतर पंतने घेतली खेळाडूंची भेट
दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामन्यानंतर पंत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला, जिथे त्याने सर्व खेळाडूंची भेट घेतली. शुभमन गिलने सोशल मीडियावर पंतचा फोटोही शेअर केला होता, जो क्रिकेटप्रेमींना खूप आवडला होता.