आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांनंतर भिडले गंभीर-कोहली:2013 नंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, कोहलीने बंगळुरूचा बदला लखनऊमध्ये घेतला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 16व्या हंगामात विराट कोहली आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर लखनऊच्या एकाना मैदानावर एकमेकांशी भिडले. आयपीएल दरम्यान या दोन खेळाडूंमध्ये वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये आयपीएलच्या सहाव्या हंगामातील एका सामन्यादरम्यान दोन खेळाडूंमध्ये मैदानावर बाचाबाची झाली होती.

तेव्हा विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आणि गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. सामन्यात सुरुवातीला कोहलीचा रजत भाटियासोबत मैदानावर वाद झाला होता. सामन्यानंतर गंभीर आणि कोहली यांच्यातील वाद वाढला. या सामन्यात केकेआरचा पराभव झाला होता.

या वादानंतर, LSG मार्गदर्शक गौतम गंभीर आणि माजी RCB कर्णधार विराट कोहली यांना IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला. एलएसजीचा गोलंदाज नवीन-उल-हकलाही त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोहली आणि नवीनने आपली चूक मान्य केली आहे.

3 क्षण ज्यामुळे भांडण झाले
चौथे षटक : सामन्याचे चौथे षटक सुरु होते. कृणाल पंड्या आणि आयुष बडोनी फलंदाजी करत होते. ग्लेन मॅक्सवेलच्या तिसऱ्या चेंडूवर पंड्याने लाँग ऑनचा फटका मारला. दुसरीकडे विराटने हा झेल घेतला. विराटने स्टँडकडे बघत छाती ठोकली. यानंतर त्याने तोंडावर बोट ठेवून इशारा केला. गौतम डगआऊटमध्ये बसून हे सर्व पाहत होता.

कृणाल पंड्याचा झेल घेतल्यानंतर लखनऊमध्ये शांत राहण्याऐवजी कोहलीने गोंधळ घालण्याचा इशारा केला.
कृणाल पंड्याचा झेल घेतल्यानंतर लखनऊमध्ये शांत राहण्याऐवजी कोहलीने गोंधळ घालण्याचा इशारा केला.

17व्या षटकात विराट धावत आला : लखनऊच्या डावाच्या 17व्या षटकात, विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि नवीन-उल-हकला पाहून काहीतरी हातवारे केले. यावर नवीनही त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. आरसीबीचा दिनेश कार्तिक आणि अंपायर आले आणि दोघांना वेगळे केले.

सामन्यादरम्यान नवीन आणि कोहली यांच्यातील वाद पंचांनी शांत केला.
सामन्यादरम्यान नवीन आणि कोहली यांच्यातील वाद पंचांनी शांत केला.

नवीन-विराट मॅचनंतर हस्तांदोलन करत होते : जेव्हा लखनऊ आणि बंगळुरूचे खेळाडू मॅचनंतर हस्तांदोलन करत होते. यादरम्यान अफगाणिस्तानचा नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात वाद सुरू झाला. आरसीबीचे खेळाडू कोहलीला घेऊन निघून गेले.

सामन्यानंतर नवीन आणि विराट हस्तांदोलन करताना. इथे पुन्हा वादाला सुरुवात झाली.
सामन्यानंतर नवीन आणि विराट हस्तांदोलन करताना. इथे पुन्हा वादाला सुरुवात झाली.

त्यानंतर विराटने लखनऊचा अष्टपैलू खेळाडू काइल मेयर्ससोबत गप्पा मारायला सुरुवात केली. त्यानंतर गंभीर आला आणि मेयर्सला सोबत घेऊन जाऊ लागला. त्याचवेळी गंभीर काहीतरी बोलू लागला. यानंतर कोहलीने उत्तर दिले. त्यानंतर प्रकरण वाढले आणि दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर पंच आणि वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा आणि लखनऊचे कोचिंग स्टाफ सदस्य विजय दहिया यांनी हस्तक्षेप केला.

गंभीर आणि विराटमध्ये सुमारे ५ मिनिटे वादावादी झाली.
गंभीर आणि विराटमध्ये सुमारे ५ मिनिटे वादावादी झाली.
पंच आणि वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा आणि लखनऊचे कोचिंग स्टाफ सदस्य विजय दहिया यांनी मध्यस्थी केली.
पंच आणि वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा आणि लखनऊचे कोचिंग स्टाफ सदस्य विजय दहिया यांनी मध्यस्थी केली.

2013 मध्येही दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता
खरेतर, या मोसमात लखनऊ सुपर जायंट्सने १० एप्रिल रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. त्यानंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीरने स्टँडकडे बोट दाखवत हुटींग केली होती.

लखनऊचा मार्गदर्शक गंभीर बंगळुरू येथील त्याच्या घरी झालेल्या पराभवानंतर भडकला होता.
लखनऊचा मार्गदर्शक गंभीर बंगळुरू येथील त्याच्या घरी झालेल्या पराभवानंतर भडकला होता.

कधीकाळी गौतमने विराटला सामनावीराचा पुरस्कार दिला होता
2009 मध्ये गौतम गंभीरने विराटला सामनावीराचा पुरस्कार दिला होता. खरे तर, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गौतमने 150 धावांची खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात विराटने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. गंभीरने पुढे येऊन विराटकडे पुरस्कार सुपूर्द केला.

बंगळुरूने लखनऊला हरवून बदला पूर्ण केला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपरजायंट्ससोबत हिशोब चुकता केला आहे. संघाने लखनऊचा त्यांच्या घरच्या मैदानावर 18 धावांनी पराभव केला. चालू हंगामातील मागील सामन्यात लखनऊने बंगळुरूचा त्यांच्या घरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर एका विकेटने पराभव केला होता.

लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी एकना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ 19.5 षटकांत सर्वबाद 108 धावांत आटोपला.